मित्राला सावरण्यास मित्र धावले... एक नवे आयुष्य फुलले! कोल्हापुरातील सेंट झेविअर्सच्या माजी विद्यार्थ्यांचे नातेबंध 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 06:03 PM2022-12-28T18:03:08+5:302022-12-28T18:03:27+5:30

फसवणुकीतून वैफल्य आले. मन:स्थिती बिघडली. नोकरीही सोडली. रस्त्यावरील रिकाम्या बाटल्या गोळा करून त्या विकायच्या व मिळेल ते पोटाला खाऊन जगायचे असा दिनक्रम.

Friends rushed to save the friend, An alumni of St Xavier Kolhapur changed a friend's life | मित्राला सावरण्यास मित्र धावले... एक नवे आयुष्य फुलले! कोल्हापुरातील सेंट झेविअर्सच्या माजी विद्यार्थ्यांचे नातेबंध 

मित्राला सावरण्यास मित्र धावले... एक नवे आयुष्य फुलले! कोल्हापुरातील सेंट झेविअर्सच्या माजी विद्यार्थ्यांचे नातेबंध 

googlenewsNext

विश्वास पाटील

कोल्हापूर : मित्र धावले मित्रांसाठी.. एक नवे आयुष्य फुलले.. असाच अनुभव विवेक चिटणीस (वय ४९, रा. मूळ राजारामपुरी) यांना आला. काही प्रसंगाने त्यांचे आयुष्य पुरते भरकटले होते. रस्त्यावरील रिकाम्या बाटल्या गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या या मित्राच्या मदतीला त्याच्या सेंट झेविअर्स शाळेतील १९८९ च्या बॅचमधील मित्र धावले आणि त्याचे आयुष्यच बदलून गेले. विजय चिटणीस मंगळवारी सकाळी आयुष्याची नवी सुरुवात सेवेने करण्यासाठी मध्य प्रदेश येथे नर्मदा परक्रिमेला रवाना झाले.

चिटणीस या मित्राला निरोप देण्यासाठी रेल्वेस्थानकावर अमर क्षीरसागर, तुषार पाटील, अभिजित भोसले, शिरीष पाटील, प्रदीप मुदलियार, मन्सूर गोवावाला हे जमले होते. त्याला भेटण्यासाठी मुद्दाम अमेरिकेहून अमित देशपांडे आले होते. मित्र चांगला झाल्याचा आनंद व तो सोडून दूर जात असल्याचा अनुभव अशा सुख-दु:खाच्या संमिश्र भावनांनी ते गलबलून गेले.

जे घडले, चिटणीस यांच्या वाट्याला आले ते मैत्रीची ताकद सांगणारे, माणुसकीवरील श्रध्दा वाढवणारे आहे. विवेक हे सेंट झेविअर्सचे माजी विद्यार्थी. वर्गात अत्यंत हुशार. त्यांचे आई व भाऊ सध्या अमेरिकेत. विवेक स्वत: कोल्हापुरातील नामांकित हॉटेलमध्ये व्यवस्थापक होते. चांगलेल सुंदर आयुष्य सुरू होतं; परंतु काही कारणांतून फसवणुकीतून वैफल्य आले. मन:स्थिती बिघडली. नोकरीही सोडली. रस्त्यावरील रिकाम्या बाटल्या गोळा करून त्या विकायच्या व मिळेल ते पोटाला खाऊन जगायचे असा दिनक्रम. १६ जुलैच्या सुमारास रविराज निंबाळकर यांना दाभोळकर कॉर्नरला पाठीवर पोते घेऊन बाटल्या गोळा करताना विवेक आढळले. 

त्यांना मानसिक आधार दिला व लगेच आधीच नियोजन केल्यानुसार ‘सावली’मध्ये नेऊन दाखल केले. मित्रांनीच त्याच्यासाठी नवे कपडे घेऊन दिले. त्यांच्या तेथील सहा महिन्यांचा देखभालीचा खर्च सर्वांनी उचलला. आठवड्यातून दोन-तीन दिवस सारे मित्र त्यांची तिथे जाऊन ख्याली-खुशाली विचारत होते. डॉ. देवेंद्र होशिंग यांनी त्यांच्या पायाच्या तळव्याची शस्त्रक्रिया केली. ज्यामुळे त्यांना आता नीट चालता येऊ लागले. कपडे, बूट, स्वेटरपासून मोबाइलपर्यंत प्रत्येक गोष्ट त्यांना दिली. चार हॉटेलमधील नोकरीच्या ऑफर त्यांच्या हातात होत्या; परंतु त्यांनी त्यास नकार दिला. पुन्हा सांसारिक मोहात न अडकता वेगळ्या वाटेने जाण्याचा निर्णय घेतला व डबडबलेल्या डोळ्यांनी सर्व मित्रांचा निरोप घेतला.

Web Title: Friends rushed to save the friend, An alumni of St Xavier Kolhapur changed a friend's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.