जनता दलाच्या कार्यकर्त्यांचा भोगावतीवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 08:12 PM2017-09-19T20:12:48+5:302017-09-19T20:15:16+5:30
भोगावती : परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याने सन २०१६-१७ या गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाला दुसरा हप्ता ३०० रुपये यासह विविध मागण्यासाठी मोर्चा
भोगावती : परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याने सन २०१६-१७ या गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाला दुसरा हप्ता ३०० रुपये यासह विविध मागण्यासाठी मोर्चा घेऊन आलेल्या जनता दलाच्या कार्यकर्त्यांना भोगावतीचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी चांगलेच खडसावले, त्यामुळे मोर्चा घेऊन आलेले कार्यकर्ते आणि संचालक मंडळात खडाजंगी होण्याची वेळ आली.
जनता दलाचे जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव पाटील, विठ्ठलराव खोराडे यांच्या नेतुत्वाखाली मोर्चा काढण्यात आला, मोर्चेकराकरवी सोळा महिन्याची सभासद साखर, आणि दुस?्या हप्त्याची मागणी करून निवेदनात असे म्हटले आहे, जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी ३००० हजार रुपये दर दिला आहे, मात्र, भोगावतीती ने २ हजार ७२७ च्यावर अद्याप काही दिलेले नाही, त्याचा परिणाम येणा?्या हंगामावर होणार आहे. याचा विचार करून दुसरा हप्ता दयावा.उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर म्हणाले,भोगावती च्या आर्थिक परिस्थिती बाबत मी सातत्याने वार्षिक सभेला बोलत आलो आहे, आता कामगार पगार आणि साखर दिली त्यासाठी पी,एन,पाटील यांनी जिल्हा बँक कडून पैशाची उपलब्धता केली त्यावेळी पगार दिला होता त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरु आहेत.
या निवेदनावर जिल्हा अध्यक्ष अरुण सोनाळकर, संभाजीराव पाटील,विठ्ठल मुसळे,श्रीकांत साळोखे,इकबाल कलोट,डी.जो. चौगले,सजेर्राव बुगडे,यशवंत पाटील,दिनकर पाटील आदीसह असंख्य कार्यकर्त्याच्या सह्या आहेत.
या मोचार्ला उत्तर देताना अध्यक्ष पाटील म्हणाले, तुम्ही केलेले काम आम्ही आता निस्तारतो आहे,भोगावती
कारखान्यावर कर्जे आम्ही केली नाहीत, ती तुम्ही केली आहेत, साखरेला १० कोटी ५४ लाख भरावे लागतात, सध्या पैसे
उपलब्ध नाहीत, पैसे उपलब्ध होतील त्याप्रमाणे या गोष्टी केल्या जातील.
आम्ही सत्तेवर आलो त्यावेळी आमच्या जमिनी गहाण ठेऊन कॉंग्रेसच्या काळातील सभासदाची देणी भागवली होती, आताच्या आर्थिक परिस्थितीला मधल्या काळातील प्रशासकीय कारभार कारणीभूत आहे, त्यासाठी आम्हाला जबाबदार धरू नका असे वसंतराव पाटील यांनी सांगितले.