निवडणूक अधिकाऱ्यांसमोरच ‘राष्ट्रवादी’ची गटबाजी

By admin | Published: March 29, 2015 11:56 PM2015-03-29T23:56:46+5:302015-03-30T00:11:09+5:30

इचलकरंजीतील राष्ट्रवादीचे राजकारण : स्वतंत्र बैठका घेऊन आरोप-प्रत्यारोप

In front of election officials, the 'Nationalist' grouping | निवडणूक अधिकाऱ्यांसमोरच ‘राष्ट्रवादी’ची गटबाजी

निवडणूक अधिकाऱ्यांसमोरच ‘राष्ट्रवादी’ची गटबाजी

Next

इचलकरंजी : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षांतर्गत सुरू असलेल्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, यासाठी पक्षातील वाद संपुष्टात यावेत, अशी भूमिका घेऊन आलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांना गटबाजीचे आज, रविवारी दर्शन घडले. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शहर कार्यालयात कारंडे गटाने, तर नगरपालिका कामगार संघटनेच्या कार्यालयात जांभळे-माने गटाने बैठक घेऊन परस्परविरोधी आरोप-प्रत्यारोप करीत टीकाटिप्पणी केली.राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये पूर्वीपासूनच गटबाजी आहे. मात्र, फेब्रुवारी महिन्यामध्ये नगरसेवक विठ्ठल चोपडे यांना तात्पुरते निलंबित करा, अशी जिल्हाधिकाऱ्यांना जांभळे-माने गटाने शिफारस केली. तर नगरपालिकेतील पक्षप्रतोद रवींद्र माने यांना पक्षातून निलंबित करावे, असे आदेश कारंडे गटाने पक्षश्रेष्ठींकडून मिळविले. या घटनेमुळे गटबाजीची तीव्रता वाढली. माने यांच्या निलंबनाला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून स्थगिती घेण्यात आली. त्यानंतर मुंबई येथे प्रदेश कार्यालयात तटकरे व अजित पवार यांच्यासमोर कारंडे व जांभळे-माने गटांनी आपआपली बाजू मांडली आणि निलंबनाचा विषय स्थगित राहिला.
इचलकरंजीमध्ये शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी व विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी अशा दोन समित्या आहेत. या दोन्ही समित्यांकडील पदाधिकारी व कार्यकारिणी यांची निवड बिनविरोध व्हावी, अशी पक्षश्रेष्ठींची अपेक्षा असल्याने रविवारी इचलकरंजी येथे निवडणूक उपअधिकारी अनिल साळुंखे व भैया माने हे आले होते. त्यांच्यासमोर आपली बाजू मांडण्यासाठी कारंडे गटाने राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शहर कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची व्यापक बैठक बोलावली. इचलकरंजीतील पक्षाचे पदाधिकारी निवडण्याचे अधिकार मदन कारंडे यांना द्यावेत, असे या बैठकीत सांगण्यात आले. बैठकीसाठी या गटाचे माधुरी चव्हाण, शुभांगी माळी व लतीफ गैबान हे तीन नगरसेवक अनुपस्थित राहिले.
त्यानंतर या दोन्ही पदाधिकाऱ्यांन्5ाी कामगार संघटनेच्या कार्यालयात जाऊन तेथे जांभळे-माने गटाच्या समर्थकांचे म्हणणे ऐकून घेतले. या बैठकीत नगरसेवक भाऊसाहेब आवळे, पक्षप्रतोद रवींद्र माने, महेश ठोके, आदींची भाषणे झाली. या गटातर्फे माजी खासदार निवेदिता माने व माजी आमदार अशोकराव जांभळे यांना पक्षाचे पदाधिकारी निवडण्याचे अधिकार देण्यात आले. बैठकीत बोलताना माने यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसने आमचा योग्य तो विचार केला नाही, तर पूर्वाश्रमीचा कुंभार, कदम व माने गट एकत्रित येऊन ढाल-तलवार हाती घेण्यात येईल आणि येणाऱ्या सर्व निवडणुका बंडखोरी करून निवडण्यात येतील, असा इशारा दिला. (प्रतिनिधी)


गटबाजीचा अहवाल पक्षश्रेष्ठींना देणार
अनिल साळुंखे व भैया माने म्हणाले, इचलकरंजीतील राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये असलेल्या गटबाजीमुळे येथे पक्षाची ताकद विखुरली जात आहे. आता पक्षांतर्गत निवडणुका होणार असल्याने गटबाजी विसरून सर्वांनी एकत्रित यावे आणि निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, यादृष्टीनेच आम्ही प्रयत्न करीत आहोत. या दोन्ही बैठकांमधील अहवाल लवकर पक्षश्रेष्ठींना देण्यात येईल आणि त्याबाबतचा निर्णय पक्ष घेईल.

Web Title: In front of election officials, the 'Nationalist' grouping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.