झारखंड, महाराष्ट्रची आगेकूच
By admin | Published: April 22, 2015 11:33 PM2015-04-22T23:33:46+5:302015-04-23T00:09:50+5:30
राष्ट्रीय खो-खो स्पर्धा : विद्युतझोताने झळाळून निघाली क्रीडानगरी
सांगली : विद्युतझोताच्या प्रकाशाने कुपवाडचे खो-खो मैदान झळाळून निघाले आहे. बुधवारी यजमान महाराष्ट्र व झारखंड संघाने विजय मिळविला. २६ वी राष्ट्रीय किशोर किशोरी आणि २५ वी राष्ट्रीय पुरुष-महिला फेडरेशन महापौर चषक स्पर्धा कुपवाडमधील मैदानावर सुरू आहे. बुधवारी सकाळी महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने २१-४ अशा फरकाने छत्तीसगडचा पराभव केला. मुलांमध्ये झारखंडने १५-७ अशा फरकाने मध्य प्रदेशचा धुव्वा उडवला.बुधवारी सामन्यांचा अंतिम निकाल असा : किशोरी गट : महाराष्ट्र विजयी विरुद्ध छत्तीसगड (२१-४), झारखंड वि. वि. त्रिपुरा (९-३), उत्तर प्रदेश वि. वि. उत्तराखंड (१९-२), पश्चिम बंगाल वि. वि. दिल्ली (१२-४), गोवा वि. वि. मध्य भारत (१६-२), ओडिशा वि. वि. हिमाचल (३१-०), पंजाब वि. वि. तमिळनाडू (१०-८), केरळ वि. वि. मणिपूर (९-४). किशोर गट : कर्नाटक वि. वि. पंजाब (१८-१), विदर्भ वि. वि. त्रिपुरा (२१-१०), झारखंड वि. वि. मध्य प्रदेश (१५-७), हरियाणा वि. वि. गोवा (१२-११), उत्तर प्रदेश वि. वि. गुजरात (१७-१६), मणिपूर वि. वि. पंजाब (२२-६), कोल्हापूर वि. वि. आसाम (१८-६), आंध्र प्रदेश वि. वि. हिमाचल प्रदेश (२८-२), पश्चिम बंगाल वि. वि. दिल्ली (१४-१०). (क्रीडा प्रतिनिधी)