Lok Sabha Election 2019 नेते, कार्यकर्ते यांच्या भूमिकेपुढे पक्षही हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:43 PM2019-04-15T23:43:57+5:302019-04-15T23:44:20+5:30

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : आपल्याला सोईची असणारी भूमिका घेणाऱ्या नेते आणि कार्यकर्त्यांसमोर पक्षही हतबल झाल्याचे ...

In front of the leaders and activists, the party also defeats | Lok Sabha Election 2019 नेते, कार्यकर्ते यांच्या भूमिकेपुढे पक्षही हतबल

Lok Sabha Election 2019 नेते, कार्यकर्ते यांच्या भूमिकेपुढे पक्षही हतबल

Next

समीर देशपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आपल्याला सोईची असणारी भूमिका घेणाऱ्या नेते आणि कार्यकर्त्यांसमोर पक्षही हतबल झाल्याचे चित्र प्रामुख्याने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये दिसून येत आहे. कारवाई करायची झाली तरी कितीजणांवर कारवाई करायची असा प्रश्न असून आणि चार महिन्यानंतरच्या विधानसभेवेळी कुणाला बरोबर घेऊन फिरायचे, असा प्रश्न पक्षांसमोर आहे.
आमदार सतेज पाटील हे कॉँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेत्यांमधील एक नेते आहेत. मात्र महाडिक विरोधासाठी त्यांनी उघडपणे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या पाठीशी ताकद लावली आहे. अगदी वाढदिवसाला सुद्धा ‘आमचं ठरलंय’ अशा मथळ्याखाली जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत; परंतु पाटील यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस कॉँग्रेस पक्ष दाखवणार नाही, हे वास्तव आहे. अगदीच दाखविण्यासाठी काही नगरसेवकांवर नोटिसा काढण्याची कारवाई केली जाईल.
आजºयामध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले सदस्य जयवंतराव शिंपी यांनी मुलाच्या माध्यमातून सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली संजय मंडलिक यांच्यासाठी राबणूक सुरू केली आहे, हे अखंड तालुका पाहतोय; परंतु त्यांच्यावर कारवाई करणार कोण? पी. एन. पाटील आणि सतेज पाटील यांचे नेतृत्व मानणारे माजी आमदार दिनकरराव जाधव आठ दिवसांपूर्वी शरद पवार यांना भेटून गेले होते आणि त्यांनी दोनच दिवसांपूर्वी मंडलिक यांना पाठिंबा जाहीर केला. आता त्यांच्यावर कारवाई कुणी करायची?
दुसरीकडे, भाजपमध्येही स्थिती वेगळी नाही. महायुतीच्या प्रचारामध्ये भाजपचे आमदार अमल महाडिक आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक येणार नाहीत, हे पक्षानेही गृहीत धरले आहे. त्यामुळे किरकोळ काही पदाधिकाऱ्यांवर नोटिसा काढून निलंबनाची कारवाई केल्याचे दाखविले जाईल. जसे राष्ट्रवादीचे कोल्हापुरातील काही नगरसेवक मंडलिक यांचे काम करीत आहेत, तसेच भाजपचे काही नगरसेवक महाडिक यांच्यासाठी राबत आहेत, हे वास्तव आहे.
आजºयाचे अशोक चराटी यांच्या गटाची पूर्ण ताकद शिवसेनेला नसल्याची तक्रार आहे. तिथल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांनाही पवार यांना बोलावून घेण्याची वेळ आली. दक्षिणमधील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य, मुरगूडचे रणजितसिंह पाटील हेदेखील राष्ट्रवादीसोबत उघडपणे आहेत. शिवसेनेतीलही काही पदाधिकारीही ‘स्लो’ झाल्याचे दिसते. श्रीपतराव शिंदे जरी पवार यांना भेटून गेले असले तरी त्यांचे काही कार्यकर्ते आधीपासूनच मंडलिकांच्या प्रचारात आहेत. हातकणंगले मतदारसंघात महायुतीतील घटक पक्ष जनसुराज्य अजूनही शांत आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना मुभा दिल्याचे सांगण्यात येते. अनेक ठिकाणी नवी भाजप, जुनी भाजप असा वाद आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अरूण इंगवले हे धैर्यशील माने यांच्या प्रचारात नसल्याचीही तक्रार आहे. त्यामुळे एकूणच सर्वत्र सावळागोंधळ दिसून येत आहे.
विधानसभेला काय करायचे ?
आत्ताच बंडखोरांवर कारवाई करून त्यांना काढून टाकले तर येणाºया विधानसभेवेळी काय करायचे हादेखील पक्षासमोरचा प्रश्न आहे. पूर्वी कॉँग्रेसमध्ये तत्काळ निलंबनाची कारवाई केली जायची; परंतु जिथे प्रदेशाध्यक्षच हतबल होऊन राजीनाम्याची भाषा करतात, तिथे निलंबन कुणाचे आणि कोण करणार, असा प्रश्न आहे. त्यामुळे हे आठ दिवस रेटून नेऊन विषय संपवायचा, असे पक्षाचे धोरण दिसते.

Web Title: In front of the leaders and activists, the party also defeats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.