हाळवणकर यांच्या कार्यालयावर मोर्चा

By admin | Published: May 31, 2017 01:12 AM2017-05-31T01:12:18+5:302017-05-31T01:12:18+5:30

रेणुकानगर-धारवट झोपडपट्टीच्या पुनर्वसनाची मागणी : त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याची ग्वाही

A front of the office of Halvankar | हाळवणकर यांच्या कार्यालयावर मोर्चा

हाळवणकर यांच्या कार्यालयावर मोर्चा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क --इचलकरंजी : येथील रेणुकानगर व धारवट झोपडपट्टीचे पुनर्वसन आहे त्याच ठिकाणी करावे, या मागणीसाठी मंगळवारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने आमदार सुरेश हाळवणकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्यावतीने भेटलेल्या शिष्टमंडळाबरोबर बोलताना आमदारांनी दोन्हीही झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
येथील इंडस्ट्रियल इस्टेटलगत असलेल्या रेणुकानगर झोपडपट्टीचा पुनर्वसनाचा प्रस्ताव शासनाकडून नामंजूर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रेणुकानगर व धारवट झोपडपट्टीतील नागरिकांनी वैयक्तिक शौचालयासाठी अनुदान मिळावे, अशी मागणी नगरपालिकेकडे केली आहे. मात्र, झोपडपट्टीची जागा अन्य प्रकारच्या कारणासाठी आरक्षित आहे. त्यामुळे त्याठिकाणची झोपडपट्टी हटविण्यात येणार असल्याची माहिती झोपडपट्टीवासीयांना देण्यात आली. त्यामुळे मंगळवारी रेणुकानगर व धारवट झोपडपट्टीमधील नागरिकांनी आमदार हाळवणकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला.
आमदार हाळवणकर यांच्या कार्यालयावर आलेला मोर्चा पोलिसांनी अडविला. माकपच्यावतीने दत्ता माने, भाऊसाहेब कसबे, सदा मलाबादे, आदींचे एक शिष्टमंडळ आमदार हाळवणकर यांना भेटले. त्यावेळी आमदार हाळवणकर यांनी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर शिष्टमंडळाशी बोलताना त्यांनी झोपडपट्टी नियमित करून त्याठिकाणी घरकुल योजना राबविण्यात येईल, असे आश्वासन दिले. आंदोलनामध्ये अंबादास कुणगिरी, श्रीनिवास फुलपाटी, मालन कांबळे, सुमन काळे, मंजू मोरे, आदीं सहभागी झाले होते.


इचलकरंजीत झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी निघालेल्या मोर्चाच्या शिष्टमंडळासमोर बोलताना आमदार सुरेश हाळवणकर. यावेळी सदा मलाबादे, दत्ता माने, भाऊसाहेब कसबे, अंबादास कुणगिरी, डॉ. प्रशांत रसाळ, आदी उपस्थित होते.

Web Title: A front of the office of Halvankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.