सावकरांना रोखण्यासाठी पन्हाळ्यात आघाडी

By admin | Published: November 2, 2016 01:12 AM2016-11-02T01:12:21+5:302016-11-02T01:12:21+5:30

कळे, कोतोली नरकेंना, उर्वरित मतदारसंघ प्रत्येकाकडे : भारतआप्पा, आबा, नरके, अमर पाटील, बाबासाहेब पाटील यांची मोट

In front of the pavilion | सावकरांना रोखण्यासाठी पन्हाळ्यात आघाडी

सावकरांना रोखण्यासाठी पन्हाळ्यात आघाडी

Next

राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत माजी मंत्री विनय कोरे यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात रोखण्यासाठी मातब्बर नेत्यांनी कंबर कसली आहे. आमदार सत्यजित पाटील, आमदार चंद्रदीप नरके, भारत पाटील, अमर पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी एकत्रित मोट बांधली आहे. नरकेंना दोन तर उर्वरित मतदारसंघ प्रत्येकाला देण्यावर समझोता झाल्याचे समजते.
जिल्ह्णात उद्यास येणारी राजकीय समीकरणे पाहिली तर जिल्हा परिषदेवर एक हाती सत्ता कोणत्याच पक्षाची येण्याची शक्यता कमी आहे. दोन-तीन पक्षांना एकत्रित येऊनच सत्तेचे गणित सोडवावे लागणार आहे. जिल्हा परिषदेवर सत्ता येण्यासाठी करवीर, हातकणंगले, शिरोळसह पन्हाळा तालुक्याची महत्त्वाची भूमिका राहते. विद्यमान सभागृहात कॉँग्रेसला ‘स्वाभिमानी’चा टेकू आहे, मागील सभागृहात पहिल्या अडीच वर्षांत राष्ट्रवादीला ‘जनसुराज्य’ पक्षाचा टेकू होता. आगामी सत्तेच्या राजकारणात विनय कोरे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याने त्यांना पन्हाळा तालुक्यातच रोखण्याची व्यूहरचना सर्वच विरोधकांची आहे. त्यामध्ये पारंपरिक मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादीही काही मागे नाही.
पन्हाळा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सातवे, कोडोली, यवलूज, कोतोली, कळे, पोर्ले तर्फ ठाणे असे सहा तर पंचायत समितीचे बारा मतदारसंघ आहेत. गतवेळेला जनसुराज्य पक्षाने सातवे, कोडोली, यवलूज, पोर्ले तर्फ ठाणे अशा चार जागा जिंकल्या होत्या. आमदार नरके यांनी कळे तर आमदार सत्यजित पाटील यांनी कोतोली मतदारसंघ आपल्याकडे राखला होता. पंचायत समितीत मात्र कोरे यांना अपेक्षित न आल्याने पहिली अडीच वर्षे त्यांना सत्तेबाहेर थांबावे लागले.
‘जनसुराज्य’ने भाजपशी संधान साधल्याने कोरे यांना सत्तेची ताकद मिळणार आहे. अशा परिस्थितीत त्यांना रोखण्यासाठी सर्वच राजकीय विरोधकांना एकत्र येणे गरजेचे होते. यासाठी आमदार नरके, आमदार पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमर पाटील, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील हे कोरे यांच्या विरोधात मोट बांधणार आहेत. तशी प्राथमिक चर्चा झाली असून कोणत्या जिल्हा परिषद मतदारसंघात कोणाची ताकद आहे, त्यानुसार जागांचे वाटप केले जाणार आहे. त्यानुसार कळे, यवलूज किंवा कोतोली आमदार नरके यांना तर यवलूज किंवा कोतोलीपैकी एक सत्यजित पाटील यांना देण्यावर जवळपास एकमत झाले आहे. पोर्ले तर्फ ठाणेमधून बाबासाहेब पाटील हे आपल्या पत्नींना रिंगणात उतणार आहेत. सातवेमधून अमर पाटील हे स्वत: रिंगणात उतरणार आहेत, तिथे त्यांना सर्वच नेत्यांनी ताकद द्यावची आहे, अशी चर्चा झाली आहे. पंचायत समितीच्या जागांची वाटपही ज्याच्याकडे जिल्हा परिषद त्याच्या अंतर्गत पंचायत समिती त्याच पक्षाला देण्यावर चर्चा झाली आहे. एखाद्या ठिकाणी अपवादात्मक दुसऱ्या पक्षाचा ताकदीचा उमेदवार असेल तर जागांची अदलाबदल करण्याची तयारीही या नेत्यांची आहे. एकंदरीत सर्वच विरोधक ताकदीने एकवटले तर कोरे यांच्यासमोरील अडचणी वाढू शकतात.
नरकेंची चाचपणी!
आमदार नरके यांचे बंधू अजित नरके यांना कोतोली मतदारसंघातून रिंगणात उतरण्याच्या हालचाली आहे. कोतोली अंतर्गत बाजारभोगाव मतदारसंघ हा नरके यांचा बालेकिल्ला आहे. अध्यक्षपद खुले असल्याने ‘अजित’यांना तेथून उभे करण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. विश्वेश कोरे यांची राजकीय एंट्री जिल्हा परिषदेपासून करावी, अशा हालचाली सुरू असून सातवे मतदारसंघातून त्यांना रिंगणात उतरण्याची खेळीही होऊ शकते.
यवलूज आबांकडे राहणे शक्य
अजित नरके यांना कोतोलीतून रिंगणात उतरायचे म्हटले तर नरके यांना यवलूज सत्यजित पाटील यांना द्यावा लागणार. यवलूजमधील निम्मी गावे शाहूवाडीत आहेतच, पडळ, सातार्डे, माजगांव, शिंदेवाडी, खोतवाडी, माळवाडी ही गावे पूर्वी शाहूवाडी मतदारसंघातच होती. त्यामुळे सत्यजित यांना मतदारसंघाची अदलाबदल करण्यात अडचण राहणार नाही.
 

Web Title: In front of the pavilion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.