शेकापचा ऊस दरासाठी मोर्चा

By admin | Published: December 13, 2014 12:26 AM2014-12-13T00:26:29+5:302014-12-13T00:27:25+5:30

चळवळीसाठी आवाहन : मताच्या राजकारणाची परंपरा कायम : पवार

Front for Peacock's sugarcane price | शेकापचा ऊस दरासाठी मोर्चा

शेकापचा ऊस दरासाठी मोर्चा

Next

कोल्हापूर : सरकार कोणतंही असो, सत्तेवर येण्यापूर्वी केवळ मताचे राजकारण केले जाते. राज्यात सत्तांतर झाले परंतु, राज्यात मताच्या राजकारणाचीच परंपरा कायम आहे, अशा शब्दांत माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी राज्यातील भाजप-शिवसेना सरकारवर हल्लाबोल केला. आपल्या उसाला चांगला भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी चळवळीला तयार झाले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने आयोजित केलेल्या मोर्चावेळी पवार बोलत होते.
शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने आज, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा क ाढून निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. मोर्चाच्या सांगतावेळी संपतराव पवार-पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांचा ऊस उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. कारखान्यात ऊस घालायची वेळ येताच सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये साखरेचे दर खाली उतरतात. एकरकमी ‘एफआरपी’ देऊ शकत नाही, असा कांगावा कारखाने करतात. परंतु, त्याचा शेतकऱ्यांना फटका बसतो. कोणताही राजकीय पक्ष मतं मागताना एक बोलतो आणि सत्तेत गेल्यावर एक बोलतो. सध्याचे सरकार तर ‘एफआरपी’बाबत चर्चा करायला तयार नाही. कारखाने ती जाहीर करायला तयार नाहीत.
मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार पवार-पाटील यांच्यासह केरबा पाटील, भारत पाटील, बाबूराव कदम, दिलीप जाधव, बाबासो देवकर, जनार्दन जाधव, पांडुरंग पाटील, सुशांत बोरगे, अजित देसाई, राजाराम धनवडे, पोपटराव घाटगे, आदींनी केले.

Web Title: Front for Peacock's sugarcane price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.