ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:01 PM2019-02-26T12:01:09+5:302019-02-26T12:02:42+5:30
कोल्हापूर विविध मागण्यांसाठी सोमवारी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. सामान्य प्र्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसुळ यांनी निवेदन स्वीकारले.
कोल्हापूर : विविध मागण्यांसाठी सोमवारी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. सामान्य प्र्शासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसुळ यांनी निवेदन स्वीकारले.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी शासनाने लागू केलेला आकृतीबंध तत्काळ रद्द करावा, किमान वेतन थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, किमान वेतन न देणाऱ्या ग्रामपंचायतींची चौकशी करावी, राहणीमान भत्ता स्वतंत्रपणे द्यावा, भविष्यनिर्वाह निधीसाठी कपात केलेली रक्कम संबंधितांच्या खात्यावर जमा करावी, यामध्ये गैरव्यवहार करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करावी, सेवा पुस्तके अद्ययावत करावीत, नोकरीमध्ये कायम करावे, दुसऱ्या व चौथ्या शनिवारी पगारी सुट्टी मिळावी, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
सुकुुमार कांबळे, औदुंबर साठे, संग्राम यादव, रमेश कांबळे, माणिक कांबळे, अरुण कांबळे यांच्यासह कर्मचारी मोर्चामध्ये सहभागी झाले होते.