पहिली उचल 3100! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन मागे; दत्त दालमियाचे धुराडे सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 07:49 AM2022-10-28T07:49:11+5:302022-10-28T07:50:01+5:30
एफआरपीची पहिली उचल जाहिर केल्याशिवाय कारखाना सुरू करू नये.आशा आशयाचे निवेदन जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनेने प्रसासनाला दिले होते.
- सरदार चौगुले
पोर्ले तर्फ ठाणे : आसुर्ले-पोर्ले (ता.पन्हाळा) येथील दत्त (दालमिया भारत शुगर) साखर कारखान्याची पहिल्या उचलीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि दालमिया प्रशासन यांच्यात ऊस दराबाबत सकारात्मक चर्चा होऊन एफआरपीची पहिली उचल ३१०० रूपये घोषित केल्यानंतर संघटनेने आंदोलन मागे घेतले.दालमिया शुगरने यंदाच्या गळीत हंगामासाठी पहिली उचल ३०७५ जाहिर केल्याच्या निषेधार्थ कारखान्याची ऊस वाहतुक आणि ऊसतोड बंद केली होती.आज ऊसदराबाबत सकाळची चर्चा फिस्कटल्याने संघटनेने आंदोलन तिव्र केले होते.
एफआरपीची पहिली उचल जाहिर केल्याशिवाय कारखाना सुरू करू नये.आशा आशयाचे निवेदन जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनेने प्रसासनाला दिले होते.बुधवारी सकाळी दालमिया प्रशासनाने एफआरपीची पहिली उचल ३०७५ रूपये जाहिर करून गळीत हंगामाचा श्रीगणेशा करण्याच्या तयारीत असताना, अपेक्षेप्रमाणे दालमियाने पहिली उचल जाहिर न केल्याच्या निषेधार्थ स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याकडे ऊसाने भरून आलेल्या पाच वाहनांना गेट समोर आडवले आणि त्यांना परतीचा मार्ग दाखवला.आंदोलनाच्या दुसऱ्यादिवशी संघटनेने वाहतुक रोखून आंदोलनाची धार तिव्र केली.पोलिस प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या विचारात प्रशासन आणि आंदोलनात समेट घडवत पहिल्या उचलीत २५ रूपये वाढ करून ३१०० रूपये जाहिर केले.दरम्यान आंदोलनाला यश मिळाल्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्या गेट समोर साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
याप्रसंगी असिस्टंट जनरल मॅनेजर (केन) संग्राम पाटील, मॅनेजर (केन) शिवप्रसाद देसाई, संघटनेचे युवाध्यक्ष विक्रम पाटील, तालुकाध्यक्ष रामराव चेचर, दगडू गुरवळ, उमेश शेलार, बाबूराव शेवडे, शिवाजी शिंदे, नारायण पाटील, बाळू कोठावळे, महादेव झेंडे (पडळ), विक्रम पाटील (वाघवे) आदींसह पोलिस प्रशासन, संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.