‘एफआरपी’त २०० रुपये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:47 AM2017-10-30T00:47:30+5:302017-10-30T00:49:02+5:30
राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पुढील हंगामासाठी (२०१८-१९) उसाच्या एफआरपीमध्ये दोनशे रुपये वाढ करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने केंद्र सरकारकडे केली आहे. ९.५ साखर उताºयाला २७५० रुपये, तर त्यापुढील प्रत्येक टक्क्यास साधारणत: २८० रुपये मिळणार असल्याने ‘एफआरपी’ची रक्कम तीन हजार रुपयांच्या पुढेच जाणार आहे.
शेतकºयांचा उत्पादन खर्च, बाजारातील साखरेचे दर व साखर कारखान्यांचा उत्पादन खर्च यांचा ताळमेळ घालून उसाची एफआरपी निश्चित करण्याचे काम केंद्रीय कृषिमूल्य आयोग करतो. साधारणत: बाजारपेठेतील साखरेच्या
दराचा ठोकताळा बांधूनच हा दर ठरविला जातो. हंगाम २०१५-१६ मध्ये ९.५ टक्के साखर उताºयाला २३०० रुपये, तर त्यानंतरच्या प्रत्येक टक्क्याला २४८ रुपये ‘एफआरपी’ निश्चित करण्यात आली
होती. दुसºया हंगामासाठी ‘एफआरपी’मध्ये वाढ करण्याची मागणी शेतकरी
संघटनांनी केली होती; पण बाजारपेठेतील साखरेचे दर पाहता ‘एफआरपी’मध्ये बदल झालाच नाही. सलग दोन वर्षे एकच ‘एफआरपी’ राहिली. त्यानंतरच्या २०१७-१८ (म्हणजेच चालू हंगामासाठी) ‘एफआरपी’मध्ये वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. ९.५ साखर उताºयासाठी २५५० रुपये; तर त्यापुढील प्रत्येक टक्क्यास २६८ रुपये अशी एफआरपी मिळणार आहे. यंदाचा हंगाम अजून सुरू व्हायचा आहे. ऊसदराची कोंडी अद्याप फुटलेली नाही. वाढीव एफआरपी व शेतकरी संघटनांची मागणी यामध्ये सरकारला तडजोड करावी लागणार आहे. तोपर्यंत पुढील हंगामासाठी (२०१८-१९) प्रतिटन दोनशे रुपयांच्या वाढीची शिफारस कृषिमूल्य आयोगाने केंद्र सरकारकडे केली आहे. ९.५ साखर उताºयाला २७५० रुपये तर त्यापुढील प्रत्येक टक्क्यास साधारणत: २८० रुपये वाढ मिळणार आहे. त्यामुळे पुढील हंगामातील ‘एफआरपी’ तीन हजार रुपयांच्या पुढेच जाणार आहे.
चढ-उतार निधीची पुन्हा मागणी
बाजारातील वर्षभरातील साखरेच्या दराचा अंदाज गृहीत धरून ‘एफआरपी’ काढली जाते. त्यामुळे पुढे दर कोसळले तर कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये जातात. यासाठी साखर चढ-उतार निधीची संकल्पना कृषिमूल्य आयोगाने आणली होती, त्याला केंद्राने मंजुरी दिलेली नाही.
कशी ठरविली जाते ‘एफआरपी’...
शेतकºयांचा उसाचा उत्पादन खर्च
आंतर पिकांपासून घेतलेले उत्पन्न
साखर कारखान्यांचा उत्पादन खर्च
बाजारातील साखरेचा सरासरी दर
ग्राहकांना कमीत कमी दरात साखर मिळाली पाहिजे.
अशी राहिली एफआरपी
हंगाम ९.५ उताºयाला त्यापुढील
२०१५-१६ २३०० रुपये २४८ रुपये
२०१६-१७ २३०० रुपये २४८ रुपये
२०१७-१८ २५५० रुपये २६८ रुपये
२०१८-१९ २७५० रुपये २८० रुपये