सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची एफआरपी ३,२५० रुपये

By विश्वास पाटील | Published: December 16, 2023 11:02 AM2023-12-16T11:02:10+5:302023-12-16T11:05:51+5:30

कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांची माहिती, विस्तारित इथेनॉल प्रकल्पाचे लवकरच होणार उद्घाटन  

frp of sarsenapati santaji ghorpade sugar factory rs 3250 | सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची एफआरपी ३,२५० रुपये

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची एफआरपी ३,२५० रुपये

विश्वास पाटील, कोल्हापूर : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना चालू  गळित हंगामासाठी उसाला टनाला रूपये ३,२५० प्रमाणे एफ. आर. पी. देणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी दिली.
                 
 मुश्रीफ सांगितले,आत्तापर्यंत कारखान्याकडे गाळपासाठी आलेल्या उसाला कारखान्याने टनाला रू. ३,१५० प्रमाणे एफआरपी अदा केली आहे. दरम्यान; या गळीत हंगामात कारखान्याकडे गाळपासाठी आत्तापर्यंत आलेल्या व यापुढे येणाऱ्या सर्वच उसाला टनाला ३,२५० रुपयेप्रमाणे एफआरपी दिली जाणार आहे.

लवकरच विस्तारित इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन.......!

कारखान्याचा २०१५ साली उभारलेला दररोज ३० हजार लिटर्स क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित होता. २०१८ मध्ये प्रतिदिन ५० हजार लिटर्स अशी क्षमतावाढ केली. आता कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. रोज एक लाख लिटर्स निर्मिती क्षमतेच्या या प्रकल्पात सिरपपासून दररोज एक लाख लिटर उत्पादन सुरू आहे. ३०  टन क्षमतेच्या बॉयलरसह ३.२ मेगावॅट टर्बाइन, असे हे विस्तारीकरण झाले आहे. सन २०२३-२४ या हंगामात ऑइल कंपन्यांकडून ८० लाख लिटर्स सिरप व ६० लाख लिटर्स बी हेवीपासून, असे एकूण एक कोटी, ४० लाख लिटर्स इथेनॉल पुरवठा करण्याचे करार झाले आहेत. त्यापैकी; आजअखेर सिरपपासून अकरा लाख लिटर्स इथेनॉल निर्मिती झाली आहे. चार लाख लिटर इथेनॉलची निर्यात पूर्ण झाली असल्याचे नविद मुश्रीफ यांनी सांगितले.
 

Web Title: frp of sarsenapati santaji ghorpade sugar factory rs 3250

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.