एफआरपीसाठी रक्ताचे पाट वाहिले तरी चालतील
By admin | Published: October 11, 2015 12:11 AM2015-10-11T00:11:14+5:302015-10-11T00:13:27+5:30
रविकांत तूपकर : बावची येथे मेळावा
गोटखिंडी : ऊस कारखानदार एकरकमी एफआरपी देण्याऐवजी ते तीन हप्त्यात देऊ लागले आहेत. काही कारखाने एफआरपीपेक्षा कमी ऊस दर देऊ लागले आहेत, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कारखानदारांनी जर असेच उद्योग चालू ठेवले तर शासनाने ठरवून दिलेल्या एफआरपीची पूर्ण रक्कम एकरकमी घेतल्याशिवाय राहणार नाही, मग भले रक्ताचे पाट वाहिले तरी चालतील, असा इशारा महाराष्ट्र वस्त्रोउद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तूपकर यांनी दिला.
बावची (ता. वाळवा) येथे जाहीर सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, खासदार राजू शेट्टी यांनी दि. १६ आक्टोबरला कोल्हापूर येथील साखर संघावर एफआरपीची रक्कम एकरकमी मिळावी, यासाठी महामोर्चाचे केले आहे. या मोर्चात सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
यावेळी संजय गांधी निराधार योजना वाळवा तालुका अध्यक्ष भास्कर कदम, पोपट सुतार, जगन्नाथ भोसले, पोपटराव पाटील, सर्जेराव पाटील, आनंदराव साळुंखे, हरिभाऊ पाटील, भास्कर भागवत, विलास यादव, गणी मुल्ला, रमजान मुलाणी, यासीन मुल्ला, सुरेश पाटील, दत्तात्रय पाटील यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)