कांद्यासह फळांची आवक २५ टक्क्यांनी घटली, पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 03:03 PM2019-08-02T15:03:20+5:302019-08-02T15:17:03+5:30

    कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या आवकेवर ...

Fruit arrivals with onion declined by 5% | कांद्यासह फळांची आवक २५ टक्क्यांनी घटली, पावसाचा फटका

कांद्यासह फळांची आवक २५ टक्क्यांनी घटली, पावसाचा फटका

Next
ठळक मुद्देकांद्यासह फळांची आवक २५ टक्क्यांनी घटलीपावसाचा फटका : भाजीपाल्याची आवक, दरातही चढउतार

 

 

कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या आवकेवर परिणाम झाला आहे. कांद्यासह फळांची आवक २५ ते ३० टक्क्यांनी घटली आहे. भाजीपाल्याची आवकही कमी-जास्त होत असून दरातही चढउतार दिसत आहेत.

कोल्हापुरात शिरोळ, हातकणंगलेसह आजूबाजूच्या गावांतून येणाऱ्या भाजीपाल्याचे प्रमाण जास्त आहे. याशिवाय शेजारच्या कर्नाटकच्या उत्तर भागातून भाजीपाला मार्केट यार्डात येतो. तीन दिवसांपासून सर्वच भागांत अतिवृष्टीसदृश पाऊस पडत आहे. शिवारात पाणी साचल्याने तयार भाजीपाला काढण्यावर मर्यादा आल्या आहेत. परिणामी सौद्यासाठी येणाऱ्या मालाचे प्रमाण कमी झाले आहे.

पालेभाज्यासह दोडका, काकडीसारख्या वेलवर्गीय फळभाज्यांना जास्त पाऊस चालत नाही. शिवारात पाणी तुंबले की त्यांची मुळे कुजून उत्पन्नावर परिणाम होतो. बाजारातील भाज्यांची आवकही कमी झाली आहे. चार दिवसांपूर्वी कोथिंबिरीची आवक ३१००० पेंढी होती, ती आता २३ हजारांवर आली आहे. दरातही १०० रुपयांनी कमी आहे.

मेथीची आवक एक हजाराने वाढली आहे. दरातही शेकड्यामागे १०० ने वाढ झाली आहे. ओल्या वाटाण्याची आवक केवळ ३० पोती असली तरी दरात २०० रुपयांनी घसरणच दिसत आहे. गवार, घेवड्याची आवक केवळ २० टक्केच आहे.

बाजारात मध्यप्रदेश, कर्नाटकसह परदेशांतून फळे येतात; पण पूरस्थितीमुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याने आवक २५ ते ३० टक्क्यांनी रोडावली आहे. मोसंबी, सफरचंद, डाळींब आणि सीताफळ वगळता अन्य फळांची आवकच झालेली नाही. दर मात्र स्थिर आहेत. तीन दिवसांपूर्वी पपई, आलुबंकर, पिअर्स, पपई, पेरू, चिक्कू, केळी, किव्ही, खजूर, आंबा दशेरी यांची आवक होती.

ओली मिरची १०० ने कमी, तर आले ४०० रुपयांनी वाढले

ओल्या मिरचीची आवक बाजारात दुप्पट झाली असून, दरात निम्म्याने घसरण झाली आहे. १० किलोंना ३०५ रुपये असणारा दर १८५ वर आला आहे. हीच परिस्थिती आल्याची झाली आहे. त्याची आवक फक्त ७८ पोती असून दरही तीन दिवसांपूर्वीच्या तुलनेत ४०० रुपयांनी वाढून प्रती १० किलो १००० रुपये झाला आहे.

कांद्याच्या आवकेवरही परिणाम

कांद्याच्या आवकेवरही परिणाम झाला आहे. मार्केट यार्डामध्ये रोज ३० ते ४० ट्रक कांदा येतो. गुरुवारी झालेल्या सौद्यावेळी केवळ २५ ट्रक इतकाच कांदा आला. कांद्याची प्रतही खालावली असल्याने त्याला उठाव नाही. दरातही क्विंटलमागे २० ते ३० रुपयांची सुधारणा दिसत आहे.
 

 

Web Title: Fruit arrivals with onion declined by 5%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.