दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी केलेल्या प्रयत्नाचे फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:25 AM2021-04-07T04:25:06+5:302021-04-07T04:25:06+5:30

नॅशनल असेसमेंट ॲक्रेटेशन कौन्सिल अर्थात नॅककडून ‘ए’ दर्जा प्राप्त करून राज्यातच नव्हे तर देशात आपण गुणवत्तेच्या बाबतीत किती सरस ...

The fruit of our efforts to get quality education | दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी केलेल्या प्रयत्नाचे फळ

दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी केलेल्या प्रयत्नाचे फळ

Next

नॅशनल असेसमेंट ॲक्रेटेशन कौन्सिल अर्थात नॅककडून ‘ए’ दर्जा प्राप्त करून राज्यातच नव्हे तर देशात आपण गुणवत्तेच्या बाबतीत किती सरस आहोत हे कुरुकली (ता. करवीर) येथील भोगावती महाविद्यालयने दाखवून दिले. देशाच्या ग्रामीण भागातील ‘ए’ दर्जा प्राप्त होणारे भोगावती महाविद्यालय हे पहिलेच कॉलेज आहे.

ते पुढे म्हणाले, यापूर्वी झालेल्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात बी नामांकन मिळाले होते. कमिटीने संशोधन, क्रीडा, ग्रंथालय, लेडीज सेंटर, स्पर्धा परीक्षा केंद्र, अशा विविध क्षेत्रात केलेले काम पाहून ‘ए’ दर्जा दिला. भाेगावती शिक्षण मंडळ, कारखान्याचे संचालक मंडळ, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, संस्थेचे सभासद या सर्वांचे माेलाचे याेगदान आहे. प्राचार्य डॉ. दिनकर पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील संचालक बबनराव पाटील, उपप्राचार्य आर.बी. हंकारे, नॅकचे समन्वयक प्रा. डाॅ.टी.एम. चाैगले, ग्रंथपाल एस. कल्लाेळी, प्रा.डी. के. दळवी, प्रा. डाॅ.एन.के. बनसाेडे, प्रा. एम.एम. कांबळे आदींची भाषणे झाली.

संचालक मंडळ, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक एम.आर. पाटील, बंडाेपंत वाडकर, पी.बी. कवडे, विलास पाटील, गाेविंदा चाैगले, मच्छींद्रनाथ पाटील, सरदार पाटील, उदय चव्हाण, पी.एस. पाटील, उपप्राचार्य आर.बी. हंकारे, नॅकचे समन्वयक प्रा. डाॅ.टी.एम. गले, प्रबंधक पी.एस. पाटील, श्यामराव काेईगडे आदी उपस्थित होते.

Web Title: The fruit of our efforts to get quality education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.