इंधन दरवाढ, महागाई कमी करा अन्यथा रस्त्यावर उतरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:31 AM2021-06-16T04:31:10+5:302021-06-16T04:31:10+5:30
कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधनामध्ये झालेल्या भरमसाठ वाढीमुळे महागाईचा आगडाेंब उसळला आहे. सर्वसामान्य जनतेचे जगणे अवघड बनले ...
कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधनामध्ये झालेल्या भरमसाठ वाढीमुळे महागाईचा आगडाेंब उसळला आहे. सर्वसामान्य जनतेचे जगणे अवघड बनले आहे. त्यामुळेच ही दरवाढ मोदी सरकारने तातडीने मागे घ्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कोल्हापूर शाखेने दिला आहे.
महागाईच्या विरोधात जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नंदकुमार गोंधळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसा गलांडे यांना निवेदन देऊन सर्वसामान्य जनतेच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊनदेखील इंधनाचे दर शंभरी पार गेले आहे. कराचे ओझे कमी करून जनतेला दिलासा द्यावा,अन्यथा ही जनता पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही दिला.
आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष रतन कांबळे, हातकणंगले अध्यक्ष विद्याधर कांबळे, करवीर अध्यक्ष रमेश पाचगावकर, तालुका संघटक मच्छिंद्र राजशील, जिल्हा संघटक विलास भास्कर, सुधाकर माने, जगन्नाथ कांबळे यांनी सहभाग घेतला.
फोटो: १५०६२०२१-कोल- पीपल रिपब्लिक
फोटो ओळ : इंधन दरवाढ व महागाईच्या विरोधात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कोल्हापूर शाखेतर्फे मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसो गलांडे यांना निवेदन देऊन सर्वसामान्य जनतेच्या व्यथा मांडल्या गेल्या.