जिल्ह्यात ‌इंधन विक्रीत २५ ते ३० टक्क्यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 01:35 PM2020-09-15T13:35:07+5:302020-09-15T13:38:03+5:30

लॉकडाऊन उठल्यानंतरही अनेक उद्योग कमीत कमी मनुष्यबळावर सुरू आहेत; तर मालवाहतुकीसह प्रवासी वाहतूकही मंदावली आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २५ ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे.

Fuel sales in the district declined by 25 to 30 per cent | जिल्ह्यात ‌इंधन विक्रीत २५ ते ३० टक्क्यांनी घट

जिल्ह्यात ‌इंधन विक्रीत २५ ते ३० टक्क्यांनी घट

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात ‌इंधन विक्रीत २५ ते ३० टक्क्यांनी घटजागतिक बाजारात ब्रेंट क्रुडचे दर उतरले, तरीसुद्धा विक्रीदर चढेच

कोल्हापूर : लॉकडाऊन उठल्यानंतरही अनेक उद्योग कमीत कमी मनुष्यबळावर सुरू आहेत; तर मालवाहतुकीसह प्रवासी वाहतूकही मंदावली आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २५ ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे.

संपूर्ण जिल्ह्यात २९८ पंप आहेत. त्यांच्या माध्यमातून रोज पाच लाख लिटर पेट्रोलची, तर सहा लाख लिटर डिझेलची विक्री लॉकडाऊनपूर्वी होत होती. त्यानंतर तीन महिने लॉकडाऊनमध्ये गेले.

अनलॉक झाल्यानंतर काहीअंशी उद्योग, व्यवसाय पूर्वपदावर येऊ लागले आहेत; तर नोकरदार मंडळी अजूनही अनेकजण वर्क फ्रॉम होम करीत आहेत. त्यामुळे इंधन विक्रीत घट झाली आहे. सद्य:स्थितीत रोज पेट्रोल साडेतीन लाख लिटर व डिझेल चार लाख लिटर इतका खप होत आहे. त्यामुळे अनुक्रमे पेट्रोल दीड लाख, तर डिझेल विक्रीत दोन लाख लिटर घट झाली आहे.

पेट्रोल ८८.४० रुपये लिटर

ऑगस्ट महिन्यात झालेली इंधनवाढ अद्यापही कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारात ब्रेंट क्रुडचे दर ३९.७४ डॉलर असे कमीही झाले आहेत. मात्र, दर उतरताना लिटरमागे १५ ते २८ पैसे या पटीने उतरत आहेत. सोमवारी पेट्रोलचा भाव ८८.४०, तर डिझेलचा भाव ७८.१७ असा प्रतिलिटर होता.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालवाहतूक व प्रवासी वाहतूक अजूनही सुरू झालेली नाही. त्यामुळे पेट्रोल, डिझेल विक्रीत घट झाली आहे. जिल्ह्यात दिवसाला डिझेल दोन लाख, तर पेट्रोल दीड लाख लिटर अशी विक्रीत घट होत आहे.
- गजकुमार माणगावे,
अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पेट्रोल, डिझेल डीलर्स असोसिएशन


लॉकडाऊन उठल्यानंतरही अनेक उद्योग कमीत कमी मनुष्यबळावर सुरू आहेत; तर मालवाहतुकीसह प्रवासी वाहतूकही मंदावली आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २५ ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे.

Web Title: Fuel sales in the district declined by 25 to 30 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.