शहीद जवान संग्राम पाटील यांच्या स्वप्नपूर्तीसाठी डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे तीन लाखांचा धनादेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:19 AM2020-12-07T04:19:17+5:302020-12-07T04:19:17+5:30
भारतीय सैन्यदलात कार्यरत निगवे खालसा (ता. करवीर) येथील हवालदार संग्राम शिवाजी पाटील हे पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झाले. ...
भारतीय सैन्यदलात कार्यरत निगवे खालसा (ता. करवीर) येथील हवालदार संग्राम शिवाजी पाटील हे पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झाले. त्यांच्या अपुऱ्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून रविवारी आमदार ऋतुराज पाटील यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे त्यांना तीन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी एक भाऊ म्हणून आपण सदैव आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी पाटील कुटुंबीयांना दिली.
करवीरचे माजी उपसभापती सागर पाटील, अशोक किल्लेदार, टी. वाय. पाटील, शहाजी किल्लेदार, पी. एम. पाटील, एल. एस. किल्लेदार, जी. जी. पाटील, विलास कांजर, प्रवीण पाटील, संतोष किल्लेदार, संतोष ऱ्हाटोड, राहुल पाटील, संजय गुरव, गजानन पाटील, एकनाथ पाटील, डी. एस. ढगे, आदी उपस्थित होते.
................................................................
०६ मदत
फोटो : जम्मू-काश्मीरमध्ये भारतमातेच्या रक्षणासाठी लढताना वीरगती प्राप्त झालेले निगवे खालसा (ता. करवीर ) येथील शहीद जवान संग्राम पाटील यांच्या कुटुंबीयांची आमदार ऋतुराज पाटील यांनी भेट घेऊन त्यांच्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी डी. वाय. पाटील ग्रुपच्या वतीने तीन लाखांचा धनादेश सुपूर्द केला.