वीर सेवा दलाकडून २००० बाटल्या रक्त संकलनाची संकल्पपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:22 AM2021-01-18T04:22:28+5:302021-01-18T04:22:28+5:30

भरत शास्त्री लोकमत न्यूज नेटवर्क २६ गावे, २६ रक्तदान शिबिरे, २००० रक्तदाते आणि २००० बाटल्या रक्तसंकलन. वीर ...

Fulfillment of resolution to collect 2000 bottles of blood from Veer Seva Dal | वीर सेवा दलाकडून २००० बाटल्या रक्त संकलनाची संकल्पपूर्ती

वीर सेवा दलाकडून २००० बाटल्या रक्त संकलनाची संकल्पपूर्ती

Next

भरत शास्त्री

लोकमत न्यूज नेटवर्क

२६ गावे, २६ रक्तदान शिबिरे, २००० रक्तदाते आणि २००० बाटल्या रक्तसंकलन. वीर सेवा दल या युवकांच्या संघटनेने पुन्हा एकदा युवाशक्तीचे सामर्थ्य दाखवून दिले. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांनी वीर सेवा दलाच्या जयसिंगपूर येथील सभेत एक हजार बाटल्या रक्तासाठी आवाहन केले होते. ते सत्यात उतरविण्यासाठी गेली अनेक दिवस वीर सेवा दलाचे पदाधिकारी झटत आहेत.

राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांनी शासनाच्या वतीने वीर सेवा दलाला रक्तसंकलन शिबिर घेऊन १००० बाटल्या रक्त जमा करण्याचे आवाहन केले होते. पण एका महिन्याच्या आत २००० बाटल्या रक्तसंकलन करून वीर सेवा दलाचे कार्यकर्ते संकल्पपूर्तीचा आनंद व्यक्त करीत आहेत.

यासाठी चेअरमन शशिकांत राजोबा, भूपाल गिरमल, एन. जे. पाटील, रावसाहेब कुन्नुरे, सुभाष मगदूम, अजित पाटील, सिद्धीविनायक कॅन्सर हॉस्पिटलचे अधिकारी व शिबिराचे संयोजक जितेंद्र पत्की व वैभव चौगुले यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

ठळक मुद्दे –

- कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील १४ ब्लड बँकांच्या मदतीने संकलन.

- दोन्ही जिल्ह्यांतील वीर सेवा दलाचे शेकडो कार्यकर्ते व नागरिकांचे योगदान

- २६ जानेवारीपर्यंत आणखी १० गावांतून संकलन केले जाणार

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील रक्तसंकलन केलेल्या गावांची नावे व रक्तसंकलन बाटल्यांमध्ये -

उमळवाड- ८६, वाळवा- ४५, टाकळी- ८२, नांदणी- १०९, घोसरवाड- ४१, अकिवाट- ५१, क. सांगाव- ११०, शिरटी- ५९, सांगली- २१, वसगडे- ५१, कानडवाडी- ३०, नांद्रे- २११, कुंभोज- १६१, डिग्रज- ८७, वळिवडे- ५७, कवठेसार- ३९, शिरगाव- ३७, रुकडी- ४५, बोलवाड- ५०, मजले- ३८, खिद्रापूर- ५२, जयसिंगपूर- ११९, बुर्ली- ५८, ब्राह्मणाळ-३०, कुरुंदवाड-१००, अब्दुललाट- ११०.

चौकट-

१. शासनाच्या आव्हानाला वीर सेवा दलाने ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला, त्याचे विशेष कौतुक. अनेक गरजूंना याचा लाभ होणार आहे.

- आरोग्य राज्यमंत्री, राजेंद्र पाटील

२. वीर सेवा दलाच्या सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते व रक्तदात्यांचे आभार. पुढेही शासनाला अशीच मदत करण्याचा निर्धार.

- शशिकांत राजोबा, चेअरमन, वीर सेवा दल

फोटो- कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथे रक्तदान शिबिराचा एक प्रसंग.

bharat shastri 9422741695

Web Title: Fulfillment of resolution to collect 2000 bottles of blood from Veer Seva Dal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.