शिवाजी विद्यापीठाच्या विकासाबाबत कुलगुरूंना पूर्ण सहकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 01:29 PM2020-10-15T13:29:12+5:302020-10-15T13:30:58+5:30

Shivaji University, kolhapurnews शिवाजी विद्यापीठाच्या विकासाच्या अनुषंगाने सर्व बाबतींत कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही विद्यापीठ विकास आघाडीच्या वतीने देण्यात आली.

Full cooperation to the Vice Chancellor regarding the development of Shivaji University | शिवाजी विद्यापीठाच्या विकासाबाबत कुलगुरूंना पूर्ण सहकार्य

कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी आणि प्राचार्य संघटनेच्या वतीने डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डावीकडून डी. यू. पवार, जे. एफ. पाटील, प्रताप पाटील, डी. आर. मोरे, भैय्या माने, जयंत आसगांवकर, चित्रलेखा कदम, आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देविद्यापीठ विकास आघाडीकडून डी. टी. शिर्के यांचा सत्कार प्राचार्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विकासाच्या अनुषंगाने सर्व बाबतींत कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही विद्यापीठ विकास आघाडीच्या वतीने देण्यात आली.

विकास आघाडीच्या वतीने प्राचार्य क्रांतिकुमार पाटील आणि विद्यापीठ प्राचार्य संघटनेच्या वतीने डॉ. डी. आर. मोरे यांनी कुलगुरू डॉ. शिर्के यांचा सत्कार करण्यात आला. विद्यापीठाच्या सर्व विभागांची डॉ. शिर्के यांना माहिती आहे. त्यांच्या रूपाने विद्यापीठाला कार्यकुशल प्रशासक मिळाले आहेत. त्यांना सर्व बाबतींत सहकार्य केले जाईल, असे विकास आघाडीच्या वतीने प्राचार्य पाटील यांनी सांगितले.

शहर आणि ग्रामीण भागांतील महाविद्यालयांच्या प्रश्नांची डॉ. शिर्के यांना जाण आहे. त्यामुळे सर्व महाविद्यालयांना निश्चितपणे लाभ होईल, असे भैय्या (प्रताप) माने यांनी सांगितले.

यावेळी आमदार राजूबाबा आवळे, प्रा. डी. यू. पवार, डॉ. जे. एफ. पाटील, जयंत आसगांवकर, डॉ. प्रताप पाटील, चित्रलेखा कदम, प्रा. मोहन राजमाने, डी. जी. कणसे, संजय जाधव, मधुकर पाटील, सागर डेळेकर, भाग्यश्री जाधव, विनोद पंडित उपस्थित होते. एल. जी. जाधव यांनी स्वागत केले. व्ही. एम. पाटील यांनी आभार मानले.

विद्यापीठाच्या नावलौकिकासाठी कार्यरत

सर्व घटकांना सोबत घेऊन विद्यापीठाला देशातील एक सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून नावलौकिक मिळावा यासाठी कार्यरत राहीन, अशी ग्वाही डॉ. शिर्के यांनी दिली.

 

Web Title: Full cooperation to the Vice Chancellor regarding the development of Shivaji University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.