कासारी भावेश्वरी मंदिर बांधकामास २१ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:22 AM2021-04-13T04:22:01+5:302021-04-13T04:22:01+5:30
कासारीत लोकसहभागातून साकारतेय भावेश्वरी मंदिर लोकमत न्यूज नेटवर्क सेनापती कापशी : कासारी (ता. कागल) येथे लोकसहभागातून सुरू असलेल्या ग्रामदेवता ...
कासारीत लोकसहभागातून साकारतेय भावेश्वरी मंदिर
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनापती कापशी : कासारी (ता. कागल) येथे लोकसहभागातून सुरू असलेल्या ग्रामदेवता भावेश्वरी मंदिर बांधकामाकरता ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी २५/१५ मधून वीस लाख व वैयक्तिक एक लाख असा एकवीस लाखांचा निधी जाहीर केला. यापैकी पहिला हप्ता देवस्थान समितीकडे सुपुर्द केला.
कासारी येथे लोकसहभागातून ग्रामदेवता भावेश्वरी मंदिराचे बांधकाम सुरू आहे. येत्या काही महिन्यांत हे मंदिर पूर्णत्वास येणार आहे. सुमारे ८० लाख रुपये खर्च या मंदिराच्या बांधकामासाठी अपेक्षित आहे. देवस्थान समितीचे अध्यक्ष तानाजी पाटील, उपाध्यक्ष धनाजी काटे व समितीच्या सदस्यांनी केलेल्या अवाहनास ग्रामस्थांंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. गावातील नागरिकांनी आपापल्या आर्थिक परिस्थितीनुसार मोठ्या प्रमाणात देणगी दिली आहे. त्यामुळे अल्पावधीतच या मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास येत आहे.
ग्रामविकासमंत्री व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी या मंदिराच्या बांधकामासाठी २५/१५ मधून वीस लाख व वैयक्तिक एक लाख रुपये असा निधी जाहीर केला. याचा चेक देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपुर्द केला. यावेळी सरसेनापती संताजी साखर कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ, राजेंद्र राजीगरे, सरपंच मन्सूर देसाई, उपाध्यक्ष धनाजी काटे, शब्बीर देसाई, डॉ. भरत पाटील आदी उपस्थित होते.
फोटो:- कासारी (ता. कागल) येथील ग्रामदेवता भावेश्वरी मंदिराच्या बांधकामासाठी निधीचा चेक ग्रामस्थांकडे सुपुर्द करताना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ. यावेळी नविद मुश्रीफ, सरपंच मन्सूर देसाई, राजेंद्र राजीगरे, धनाजी काटे, शब्बीर देसाई, भरत पाटील आदी उपस्थित होते.