कुरुंदवाड, शिरोळ पालिकांना पाच कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:28 AM2021-08-24T04:28:19+5:302021-08-24T04:28:19+5:30
जयसिंगपूर : राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नगरपरिषदेस ३ कोटी, तसेच शिरोळ नगरपरिषदेला २ कोटीचा निधी मंजूर ...
जयसिंगपूर : राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नगरपरिषदेस ३ कोटी, तसेच शिरोळ नगरपरिषदेला २ कोटीचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत विशेष कामांसाठी हा निधी वितरित केला असल्याचेही यड्रावकर यांनी सांगितले.
शिरोळ तालुक्यातील या दोन्ही नगरपरिषदांमधील पदाधिकाऱ्यांनी शहराच्या विकासासाठी निधी मिळावा यासाठीची मागणी केली होती. नव्याने स्थापन झालेल्या शिरोळ नगरपरिषदेसाठी मोठा निधी देण्यासाठी आग्रही होतो. गत दीड वर्षांत विविध योजनेतून पालिकेसाठी निधी उपलब्ध केला आहे.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन कुरुंदवाड व शिरोळ या दोन्ही नगरपालिकांना नगरविकास विभागाकडून विकासकामांसाठी निधी उपलब्ध होऊन मिळावा, अशी आग्रही मागणी केली होती. याबाबत नुकताच शासन निर्णय झाला असून नगरविकास विभागाकडून वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत कुरुंदवाड व शिरोळ या दोन्ही नगरपालिकांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला असल्याचे मंत्री यड्रावकर यांनी सांगितले.
फोटो - २३०८२०२१-जेएवाय-०६-डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर