राजर्षी छत्रपती शाहू समाधीकरिता आठ कोटींचा निधी : एकनाथ शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 19:11 IST2021-01-08T17:50:56+5:302021-01-08T19:11:43+5:30
Eknath Shinde Muncipal Corporation kolhapur- नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू समाधी स्मारक परिसरात उभारल्या जाणाऱ्या आर्ट गॅलरी तसेच अन्य विकास कामांकरिता राज्य सरकारतर्फे आठ कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेत झालेल्या बैठकीत दिले.

कोल्हापूर महानगरपालिकेत गुरुवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, उपायुक्त निखिल मोरे यांनी प्रलंबित विकास कामांचे सादरीकरण केले. यावेळी मंत्री राजेश पाटील - यड्रावकर, प्रधान सचिव महेश पाठक, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, योगेश जाधव, महेश जाधव, आमदार चंदक्रांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रल्हाद चव्हाण, अतिरीक्त आयुक्त नितीन देसाई, उपस्थित होते.
कोल्हापूर : नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू समाधी स्मारक परिसरात उभारल्या जाणाऱ्या आर्ट गॅलरी तसेच अन्य विकास कामांकरिता राज्य सरकारतर्फे आठ कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेत झालेल्या बैठकीत दिले.
शाहू मिलच्या जागेतील स्मारक कामाचा विषय मोठा असल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे व शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी आढावा बैठकीत छत्रपती शाहू समाधी स्थळाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी निधी देण्याची मागणी केली होती.
पहिल्या टप्प्यात समाधी स्मारक, सुशोभिकरणाची अडीच कोटींची कामे महापालिकेने स्वनिधीतून केली, परंतू दुसऱ्या टप्प्यात नजिकचा बाबासाहेब आंबेडकर हॉलचे नवीन बांधकाम करुन त्याठिकाणी आर्ट गॅलरी करण्यात येणार असल्याचे सरनोबत सांगितले. त्यावेळी आठ कोटी रुपये देण्याची ग्वाही मंत्री शिंदे यांनी दिली.
शाहू मिलच्या जागेतील शाहू स्मारकाबाबत बैठकीत चर्चा झाली. तेंव्हा हा विषय मोठा असल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन निर्णय घ्यावा लागेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव यांनी यासंदर्भात आपण एक आराखडा तयार केला असून तो राज्य सरकारने विचारात घ्यावा, अशी सूचना केली.
महापालिकेतर्फे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, उपायुक्त निखिल मोरे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी प्रलंबित कामांचे तसेच पूर्ण झालेल्या विकास कामांचे सादरीकरण केले.