सोनुर्ले लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी निधी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:44 AM2021-03-04T04:44:14+5:302021-03-04T04:44:14+5:30
सरूड : लोकमत न्यूज नेटवर्क सोनुर्ले (ता. शाहूवाडी) येथील रखडलेल्या लघुपाटबंधारे प्रकल्पासाठी शासनाने त्वरित निधी देऊन या प्रकल्पाचे काम ...
सरूड : लोकमत न्यूज नेटवर्क
सोनुर्ले (ता. शाहूवाडी) येथील रखडलेल्या लघुपाटबंधारे प्रकल्पासाठी शासनाने त्वरित निधी देऊन या प्रकल्पाचे काम सुरू करावे, अशी मागणी माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांनी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .
निवेदनात म्हटले आहे की, सोनुर्ले येथील ०.१३५ टीएमसी पाणी साठवण क्षमतेच्या या लघु पाटबंधारे प्रकल्पास १९ जुलै २०१८ रोजी ४६ कोटी ६४ लाख रुपयांच्या नवीन प्रस्तावास जलसंपदा विभागाने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली होती. परंतु निधीच्या तरतुदीअभावी या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. या लघु पाटबंधारे प्रकल्पामुळे सोनुर्ले, परळी, नांदगाव आदी गावातील सुमारे १२०० एकर क्षेत्र ओलिताखाली येऊन याचा मोठा फायदा या भागातील शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच या भागातील पाण्याचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी आमदार सत्यजित पाटील यांनी केली आहे.