शिक्षण विभागातील निधी इतर कामांसाठी खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:27 AM2021-02-11T04:27:33+5:302021-02-11T04:27:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : समग्र शिक्षणअंतर्गत प्राप्त झालेल्या शिक्षण विभागातील निधीतून शाळेच्या मुख्याध्यापकांनी विशिष्ट दुकानातून स्टेशनरी साहित्य खरेदी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : समग्र शिक्षणअंतर्गत प्राप्त झालेल्या शिक्षण विभागातील निधीतून शाळेच्या मुख्याध्यापकांनी विशिष्ट दुकानातून स्टेशनरी साहित्य खरेदी केल्याचे उघडकीस आले. बुधवारी नगरसेवक शशांक बावचकर यांनी मुख्याध्यापक यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. त्यावेळी तो निधी इतरत्र कामासाठी खर्च केल्याचे समजले आहे.
२६ फेब्रुवारी २०२० च्या पत्राप्रमाणे नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडी, त्यांच्यातील नेतृत्वगुण यासह त्यांच्यातील छंद व विविध कौशल्य विकसित करण्यासाठी युवा क्लब स्थापन करण्यासाठी निधी वितरित केला गेला. प्रती शाळा दहा हजार रुपयांचा निधी असून, तो स्टेशनरी खरेदी करण्यासाठी वापरला असल्याची माहिती बावचकर यांना समजली. त्यानुसार त्यांनी याबाबतचे निवेदन प्रशासन अधिकारी व इचलकरंजी शिक्षण मंडळ यांना दिले.
दरम्यान, बुधवारी बावचकर यांनी मुख्याध्यापकांना बोलावून घेतले. त्यावेळी त्या पैशातून सॅनिटायझर, स्टॅण्ड, सूचना फलक असे विविध स्टेशनरी साहित्य खरेदी केल्याचे सांगितले, तर तो निधी धनादेशाद्वारे दिला असून, धनादेश देण्याआधीच स्टेशनरीवाल्याकडून स्टेशनरी आल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.