नूलच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:30 AM2021-08-14T04:30:49+5:302021-08-14T04:30:49+5:30

नूल : स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक व ग्रामसचिवालयासह नूलच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ...

Funding for Null's development will not be allowed to dwindle | नूलच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही

नूलच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही

Next

नूल : स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक व ग्रामसचिवालयासह नूलच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

येथील श्री हनुमान मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि वास्तुशांत सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे होते. आमदार राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार पाटील म्हणाले, ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्या सहकार्याने नूलमधील विकासकामांसाठी आतापर्यंत तब्बल ५२ लाखांचा निधी दिला आहे. सर्वांना विश्वासात घेऊनच चंदगड मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधला जाईल.

कार्यक्रमास सरपंच प्रियांका यादव, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जयवंत शिंपी, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार दिनेश पारगे, रामाप्पा करिगार, सतीश पाटील, बाबासाहेब पाटील-मुगळीकर, मुकुंद देसाई, अभय देसाई, संतोष पाटील-कडलगेकर, अमर चव्हाण, ऊर्मिलादेवी शिंदे, बनश्री चौगुले, आदी उपस्थित होते.

जयसिंग चव्हाण यांनी स्वागत केले. सुनील शिंदे यांनी आभार मानले.

शिंदेसाहेबांचे मार्गदर्शन घेत चला

आमदार पाटील यांनी विकासकामांच्या निधीवाटपात सर्वांना विश्वासात घ्यावे, अशी अपेक्षा अ‍ॅड. शिंदे यांनी प्रास्ताविकात व्यक्त केली. तो धागा पकडून 'शिंदेसाहेब ज्येष्ठ नेते आहेत. गडहिंग्लजमध्ये याल त्यावेळी त्यांचा आशीर्वाद, मार्गदर्शन व सल्ला घेत चला', अशी सूचना मुश्रीफ यांनी आमदार पाटील यांना केली. याची विशेष चर्चा कार्यक्रमस्थळी होती.

फोटो ओळी : नूल (ता. गडहिंग्लज) येथील कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी श्रीपतराव शिंदे, राजेश पाटील, जयवंत शिंपी, रामाप्पा करिगार, मुकुंद देसाई, अभय देसाई, आदी उपस्थित होते.

क्रमांक : १३०८२०२१-गड-१५

Web Title: Funding for Null's development will not be allowed to dwindle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.