पडसाळी-काजिर्डा घाटरस्त्यासाठी निधी देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:22 AM2021-05-16T04:22:44+5:302021-05-16T04:22:44+5:30

कोरे यांनी उगावाई देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी मानवाडचे सरपंच फुलाजी पाटील, किसरूळचे सुभाष सावत, काजिर्डाचे सरपंच धनाजी ...

Funding for Padsali-Kajirda Ghat road | पडसाळी-काजिर्डा घाटरस्त्यासाठी निधी देऊ

पडसाळी-काजिर्डा घाटरस्त्यासाठी निधी देऊ

Next

कोरे यांनी उगावाई देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी मानवाडचे सरपंच फुलाजी पाटील, किसरूळचे सुभाष सावत, काजिर्डाचे सरपंच धनाजी आरडे, पडसाळीचे भेनू गावडे यांनी घाटाबाबत माहिती दिली.

कोरे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील अणुस्कुरा, आंबा, गगनबावडा घाटांपेक्षा पडसाळी काजिर्डा घाटरस्ता अत्यंत सोपा आहे. हा कमी अंतराचा घाट असून ग्रामीण रस्ता विकास निधीतून यासाठी जास्तीत जास्त निधी देऊ. वनखात्याच्या हद्दीत रस्त्याचा कमी प्रमाणात भाग येत असला तरी वनखात्याकडून लवकरच परवानगी मिळेल. पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी न करता रस्ता करता येईल.

यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य शंकर पाटील, पडसाळीचे विलास पाटील, पंकज पाटील, कोलिकचे श्रीपती जाधव, मानवाडचे प्रकाश दाभोळकर, पोबरेचे राजू बुकम, काळजवडेचे सरपंच शामराव पाटील, नाना पाटील, किसरूळचे बाबूराव पाटील, उपसरपंच अरुण तळेकर, पिसात्रीचे सरपंच तानाजी शिंदे, संजय पाटील, मानवाडचे सरपंच फुलाजी पाटील, कोलिकचे अर्जुन पाटील, आदी उपस्थित होते.

काजिर्डा सरपंच धनाजी आरडे यांनी मनोगत व्यक्त केले. सुभाष सावत यांनी आभार मानले.

चौकट

पडसाळी काजिर्डे घाटामुळे लोकांचा २५ किलोमीटरचा प्रवास वाचणार आहे. लोकवर्गणीतून झालेल्या चार किलोमीटरच्या या घाटासाठी ८० ते ९० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे.

- आमदार डॉ. विनय कोरे (जनसुराज्य पक्ष)

फोटो ओळ

पडसाळी-काजिर्डा घाट रस्त्याबाबत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार डॉ. विनय कोरे.

Web Title: Funding for Padsali-Kajirda Ghat road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.