कांडगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:28 AM2021-08-12T04:28:10+5:302021-08-12T04:28:10+5:30

सडोली (खालसा) : विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुकीत कांडगावचे योगदान महत्त्वाचे असून कांडगावच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार ...

Funds for the development of Kandgaon will not be reduced | कांडगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

कांडगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

Next

सडोली (खालसा) :

विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुकीत कांडगावचे योगदान महत्त्वाचे असून कांडगावच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांनी दिली. ते कांडगाव (ता.करवीर) येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी

राहुल पाटील यांची अध्यक्षपदी, तसेच रसिका पाटील यांची शिक्षण व अर्थ सभापतिपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

शिक्षण सभापती रसिका पाटील म्हणाल्या, येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळात निर्माण झालेल्या प्राथमिक शाळेची गुणवत्ता आजही टिकून असून या शाळेच्या विकासात योगदान देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमास भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक मारुतराव मेेेडसिंगे, करवीर पंचायत समिती माजी सभापती अश्विनी धोत्रे, राजेंद्र सूर्यवंशी, सरपंच रूपाली मेडसिंगे, उद्योजक दिगंबर मेडसिंगे, अमर पाटील, कृृृृष्णात नाईक, अनिल भंडारी, आनंदराव मगदूम, प्रताप पाटील, रघुनाथ चव्हाण, विनायक शिदे, संगीता हजारे, प्रवीण पाटील, ग्रामसेविका सुनंदा मोरे उपस्थित होते.

फोटो : १० कांडगाव विकासकाम

कांडगाव (ता. करवीर) येथे विविध विकासकामांचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच रूपाली मेडसिंगे, मारुतराव मेडसिंगे, अश्विनी धोत्रे, राजेंद्र सूर्यवंशी, दिगंबर मेडसिंगे उपस्थित होते.

Web Title: Funds for the development of Kandgaon will not be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.