शिरोळच्या विकासाला निधी कमी पडणार नाही : राजेंद्र पाटील-यड्रावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:25 AM2021-08-29T04:25:29+5:302021-08-29T04:25:29+5:30
शिरोळ : शाहूकालीन कल्लेश्वर तलावाचे सुशोभीकरण या परिसराचा विकास साधण्यासाठी नगरपालिकेने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. सुशोभीकरणामुळे शिरोळच्या वैभवात भर ...
शिरोळ : शाहूकालीन कल्लेश्वर तलावाचे सुशोभीकरण या परिसराचा विकास साधण्यासाठी नगरपालिकेने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. सुशोभीकरणामुळे शिरोळच्या वैभवात भर पडणार आहे. या कामासाठी राज्य शासनाकडून निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
शनिवारी येथील कल्लेश्वर तलाव सुशोभीकरणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्यमंत्री डॉ. यड्रावकर बोलत होते. अध्यक्षस्थानी दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील होते. याप्रसंगी माजी खासदार राजू शेट्टी, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, उपनगराध्यक्ष राजेंद्र माने, पं.स. सभापती दीपाली परीट प्रमुख उपस्थित होत्या.
मुख्याधिकारी तैमुर मुल्लाणी यांनी स्वागत करून कल्लेश्वर तलाव परिसर सुशोभीकरण करण्यासाठी येणारा खर्च तसेच होणाऱ्या सोयीसुविधा याबाबत माहिती विशद केली. याप्रसंगी नगरसेवक प्रकाश गावडे, तातोबा पाटील, बाबा पाटील, योगेश पुजारी, विठ्ठल पाटील, कमलाबाई शिंदे, प्रा. आण्णासाहेब गावडे, गजानन संकपाळ, डॉ. अरविंद माने, पंडित काळे, श्रीवर्धन माने-देशमुख, सचिन शिंदे, इम्रान अत्तार, एन. वाय. जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फोटो - २८०८२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - शिरोळ येथे कल्लेश्वर तलाव सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन झाले. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.