अंबाबाई मंदिराच्या दुरुस्तीसाठी लवकरच निधी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:17 AM2021-01-10T04:17:47+5:302021-01-10T04:17:47+5:30

लोकमत न्यूज नटेवर्क कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिर हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असून, स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिराच्या डागडुजी ...

Funds will soon be provided for the repair of the Ambabai temple | अंबाबाई मंदिराच्या दुरुस्तीसाठी लवकरच निधी देणार

अंबाबाई मंदिराच्या दुरुस्तीसाठी लवकरच निधी देणार

Next

लोकमत न्यूज नटेवर्क

कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिर हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असून, स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिराच्या डागडुजी व दुरुस्तीसाठी तातडीने निधीची तरतूद करू, त्यासाठी आवश्यक तो प्रस्ताव सादर करा, अशी सूचना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी देवस्थान समितीला केली. शिंदे यांनी शुक्रवारी करवीरनिवासिनी आई अंबाबाई देवीचे दर्शन घेतले.

यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र आराखडा मंजूर असून पहिल्या टप्प्यातील प्रस्तावित ८० कोटींच्या निधीपैकी फक्त ९ कोटी रुपये निधी मिळाला असून उर्वरित निधी लवकरात लवकर मंजूर करण्याची विनंती केली. यासह मंदिराच्या दगडी बांधकामाच्या छतावरील वळण धोकादायक वळणावर असून तातडीने हा कोबा काढणे गरजेचे असल्याचे सांगितले.

यावर मंत्री शिंदे यांनी राज्य शासनाने पुरातन मंदिरांच्या विकासाचा व देखरेखीचा अधिकार नगरविकास खात्याकडे दिला असून या खात्याचा मंत्री या नात्याने अंबाबाई मंदिरात होणाऱ्या दुरुस्तीस आवश्यक परवानगीची आणि निधीची जबाबदारी मी घेत असल्याचे सांगितले. तसेच मंदिरात झालेल्या पडझडीची व कराव्या लागणाऱ्या दुरुस्तीचा प्रस्ताव देवस्थान समितीने तातडीने सादर करावा असे सांगितले. यावेळी माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर, देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव उपस्थित होते.

--

फोटो नं ०९०१२०२१-कोल-अंबाबाई मंदिर

ओळ : नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेवून मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी समितीचे अध्यक्ष महेश जाधव, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, सुजित मिणचेकर उपस्थित होते.

--

Web Title: Funds will soon be provided for the repair of the Ambabai temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.