पट्टणकोडोलीत कोरोनाबाधितावर अंत्यसंस्कार, ४५ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:18 AM2021-06-06T04:18:49+5:302021-06-06T04:18:49+5:30

दरम्यान, ही घटना घडूनही ग्रामपंचायत प्रशासन आणि कोरोना सहनियंत्रण समितीने कोणतीच कारवाई केली नव्हती. याबाबत ‘लोकमत’मधून कोरोनाबाधित मृतदेहावर गर्दीत ...

Funeral on coronation in Pattankodoli, crime against 45 | पट्टणकोडोलीत कोरोनाबाधितावर अंत्यसंस्कार, ४५ जणांवर गुन्हा

पट्टणकोडोलीत कोरोनाबाधितावर अंत्यसंस्कार, ४५ जणांवर गुन्हा

Next

दरम्यान, ही घटना घडूनही ग्रामपंचायत प्रशासन आणि कोरोना सहनियंत्रण समितीने कोणतीच कारवाई केली नव्हती. याबाबत ‘लोकमत’मधून कोरोनाबाधित मृतदेहावर गर्दीत अंत्यसंस्कार हे वृत्त प्रसिद्ध होताच. आज प्रशासन जागे होऊन त्याच्याविरोधात हुपरी पोलिसांत तक्रार दिली.

पोलीस व घटनास्थळाहून मिळालेली माहिती अशी की, ग्रामपंचायत कार्यालयात रोजंदारीवर असणारा शिपाई महादेव धोंडिराम पोवार याने आपल्या भावाच्या कोरोनाबाधित जावयाच्या मृतदेहावर पट्टणकोडोली सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये शुक्रवारी अंत्यसंस्कार केले होते. या अंत्यसंस्कारास ४५ जण उपस्थित होते. तर मृतदेहावरील प्लास्टिक फाडून मृतदेह उघडा केला होता. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार सावरतकर हे करीत आहेत.

Web Title: Funeral on coronation in Pattankodoli, crime against 45

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.