जवान निपाणीकर यांच्यावर हातकणंगलेत अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:22 AM2020-12-23T04:22:37+5:302020-12-23T04:22:37+5:30
रामदास निपाणीकर यांचे मूळ गाव पणजी. हातकणंगले ही त्यांची सासुरवाडी आहे. १९८७ पासून गेली ३३ वर्षे ते बिनतारी संदेशवहन ...
रामदास निपाणीकर यांचे मूळ गाव पणजी. हातकणंगले ही त्यांची सासुरवाडी आहे. १९८७ पासून गेली ३३ वर्षे ते बिनतारी संदेशवहन यंत्रणेकडे वरिष्ठ अधिकारी म्हणून सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. त्यांनी या कालावधीत जम्मू काश्मीर, मिझोराम, नागालॅण्ड, शिलॉंग, दार्जिलिंग, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, राजस्थान, गुजरात, या ठिकाणी सेवा बजावली आहे. ४ डिसेंबरपासून त्यांची तब्बेत खालावली होती. त्यांच्यावर सिलचर येथील सैनिकी इस्पितळात उपचार सुरु होते. रविवारी २० रोजी सकाळी ११.१५ वाजता हदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले. गोव्यात मूळ गावी त्यांचे कोणीही नातेवाईक नसल्याने त्याची सासुरवाडी असलेल्या हातकणंगले येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. खास विमानाने त्याचे पार्थिव सकाळी पुण्यात आणण्यात आले. त्यानंतर लष्करी वाहनाने सायकांळी ४ वाजता पार्थिव आणण्यात आले. सायंकाळी पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे पुत्र रोहन व रोहीत यानी त्यांना अग्नी दिला. आमदार राजू बाबा आवळे, माजी आमदार राजीव आवळे, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, अशोकराव माने, प्रसाद खोबरे नगराध्यक्ष अरुण जानवेकर, रणजीत धनगर, सर्व नगरसेवक आदी मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी महामुनी, तहसीलदार प्रदीप उबाळे, हातकणंगले पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
फोटो - विरजवान
रामदास निपाणीकर यांच्यावर हातकणंगले येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुंटुंबीयांनी फोडलेला हंबरडा, उपस्थित जनसमुदाय, निघालेली अंत्ययात्रा.