N D Patil : अंत्यदर्शनावेळचा माईंचा धीरोदात्तपणा अन् शरद पवारांची साथ....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 05:45 PM2022-01-19T17:45:45+5:302022-01-19T18:02:16+5:30

माईंचा अंत्यदर्शनावेळचा धीरोदात्तपणा आणि बहिणीच्या मागे सावली बनून राहिलेले शरद पवार असा भावा-बहिणीतील नात्याचा अनोख्या कुटुंबवत्सलतेचा पदर मंगळवारी अवघ्या महाराष्ट्राने अनुभवला आणि भाऊ असावा तर असा, असे शब्द आपसुकच बाहेर पडले.

Funeral on ND Patil in Kolhapur, Sharad Pawar remained a shadow behind his sister | N D Patil : अंत्यदर्शनावेळचा माईंचा धीरोदात्तपणा अन् शरद पवारांची साथ....

N D Patil : अंत्यदर्शनावेळचा माईंचा धीरोदात्तपणा अन् शरद पवारांची साथ....

googlenewsNext

कोल्हापूर : चळवळीतील संघर्षयात्रीच्या मागे पहाडासारख्या उभ्या राहिलेल्या माईंचा अंत्यदर्शनावेळचा धीरोदात्तपणा आणि बहिणीच्या मागे सावली बनून राहिलेले शरद पवार असा भावा-बहिणीतील नात्याचा अनोख्या कुटुंबवत्सलतेचा पदर मंगळवारी अवघ्या महाराष्ट्राने अनुभवला आणि भाऊ असावा तर असा, असे शब्द आपसुकच बाहेर पडले. पवार कुटुंबीयांतील जिव्हाळा, त्यांचा साधेपणा याची झलकही यानिमित्ताने दिसली.

एन.डी.पाटील यांच्या निधनाची वार्ता समजल्यावर सोमवारीच शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबीय कोल्हापुरातील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. आल्या वेळपासून ते अंत्यसंस्कारापर्यंतची सर्व सूत्रे सांभाळतानाच सरोज पाटील ऊर्फ माई यांना धीर देताना या कुटुंबातील नात्याची वीण किती घट्ट आहे, हे दिसत होते. मोठ्यांचा मान आणि लहानांना प्रेम या सूत्राचीही प्रचिती येत होती. त्यामुळे अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री असतानादेखील कुटुंबीयांच्या बैठक व्यवस्थेत ते तिसऱ्या आणि चौथ्या रांगेतच बसल्याचे दिसले.

अंत्यदर्शनासाठी पटांगणावर उभारलेल्या व्यासपीठावर पहिल्या रांगेत शरद पवार, माई, प्रतापराव पवार हे बसले होते, त्यांच्या मागच्या रांगेत माई यांच्या बहिणी , त्यांची मुले, सुना होत्या. मागील शेवटच्या रांगेत पार्थ पवार, रोहीत पवार बसले होते. कुठे भपकेबाजी न करता नात्यातील भावबंध सांभाळताना कुटुंबीय दिसत होते. पार्थीव उचलताना अमर रहेच्या घोषणांचा गजर सुरू असताना इतके सकाळपासून धीरोदात्तपणे बसलेल्या माईंना एकदम गलबलून आले. त्यांची ही अवस्था बघून बाजूलाच बसलेले शरद पवार यांनी त्यांचा हात हातात धरुन धीर देण्याचा प्रयत्न केला. याचवेळी मागे बसलेल्या त्यांच्या बहिणी, सुनांनी लगेच धाव घेत माईंच्या भोवती गराडा टाकला. त्यांना कुठेही एकटे वाटू नये, यासाठी सर्व कुटुंबीय प्रयत्न करताना दिसत होते.

शरद पवार हे मंगळवारी सकाळी आठ वाजताच पटांगणावर पार्थीव ठेवलेल्या व्यासपीठावर माईंच्या शेजारीच खुर्ची टाकून बसले होते. दुपारी एकपर्यंत ते एकाच जागेवर बसून होते. या काळात ते येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या सांत्वनाचा स्वीकार करत होते. दोघांचेही वय झालेले, शरीर साथ देत नसतानाही संयमाचे दर्शनच त्यांनी घडवले. ते एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत, म्हटल्यावर अंत्यदर्शनासाठी आलेल्यांचाही पाय निघत नव्हता. थोडावेळ व्यासपीठावर बसून बाजूला केलेल्या बैठक व्यवस्थेत नेतेे बसलेले दिसत होते.

Web Title: Funeral on ND Patil in Kolhapur, Sharad Pawar remained a shadow behind his sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.