श्यामकांत जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 11:46 AM2019-12-21T11:46:01+5:302019-12-21T11:47:36+5:30

ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव यांच्यावर शुक्रवारी सकाळी पंचगंगा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कोल्हापूर आणि परिसरातील कला क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. जाधव यांचे चिरंजीव इंद्रजित आणि धनंजय यांनी अंत्यसंस्कार केले.

Funeral at Shyamakant Jadhav | श्यामकांत जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार

ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव यांची त्यांच्या उत्तरेश्वर पेठ येथील निवासस्थानाहून शुक्रवारी सकाळी अंत्ययात्रा काढण्यात आली. (छाया : आदित्य वेल्हाळ)

Next
ठळक मुद्देश्यामकांत जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार कोल्हापूर आणि परिसरातील कला क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी

कोल्हापूर : ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव यांच्यावर शुक्रवारी सकाळी पंचगंगा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कोल्हापूर आणि परिसरातील कला क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. जाधव यांचे चिरंजीव इंद्रजित आणि धनंजय यांनी अंत्यसंस्कार केले.

सकाळी १0 वाजता त्यांच्या उत्तरेश्वर पेठेतील निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. १0.४५ वा.च्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अगदी दोन दिवसांपूर्वी नातीला रंकाळ्यावर फिरायला घेऊन गेलेल्या जाधव सर यांच्या निधनाचे वृत्त अनेकांना रात्री उशिरा व्हॉटस अ‍ॅपवरून समजले. त्यावेळी अनेकांना धक्का बसला.

वयाच्या ८७ व्या वर्षीही त्यांचा सर्वत्र वावर असे. जाधव यांनी स्थापन केलेल्या ‘रंगबहार’ व्यासपीठाच्या माध्यमातून अनेक नवोदित कलाकारांना संधी मिळाल्याने आज ज्येष्ठ चित्रकारांबरोबरच तरुण कलाकारही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सुरेश शिपूरकर, शिवाजी म्हस्के, चंद्रकांत जोशी, जी. एस. माजगावकर, एम. आर. देशमुख, अशोक धर्माधिकारी, शाहीर राजू राऊत, संपत नायकवडी, विलास बकरे, संजय शेलार, संजय संकपाळ, सर्जेराव निगवेकर, मनोज दरेकर, अजेय दळवी, विजय टिपुगडे, टी. डी. कुलकर्णी, सुरेश पोतदार, बाळासाहेब पाटील, सागर बगाडे, पी. एस. जाधव, संग्राम भालकर यांच्यासह ‘रंगबहार’ परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डोक्यावर नेहमी बॅरट कॅप

घराबाहेर पडताना नेहमी डोक्यावर बॅरट कॅप वापरण्याचा श्यामकांत जाधव यांचा शिरस्ता होता. ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत हे जाधव यांचे मित्र. तेदेखील अशीच कॅप वापरायचे. बॅरट कॅप ही जाधव यांची एक वेगळी ओळख होती.

 

 

Web Title: Funeral at Shyamakant Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.