पन्हाळ्याच्या खचलेल्या रस्त्यापुढे आणखी भेगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:25 AM2021-07-31T04:25:26+5:302021-07-31T04:25:26+5:30

: अतिवृष्टी व भुस्खलनाने २३ जुलैरोजी पन्हाळगडावर जाणारा जुन्या नाक्याजवळील रस्ता खचला आहे. हा रस्ता खचला ...

Further to the paved road of Panhala | पन्हाळ्याच्या खचलेल्या रस्त्यापुढे आणखी भेगा

पन्हाळ्याच्या खचलेल्या रस्त्यापुढे आणखी भेगा

Next

: अतिवृष्टी व भुस्खलनाने २३ जुलैरोजी पन्हाळगडावर जाणारा जुन्या नाक्याजवळील रस्ता खचला आहे. हा रस्ता खचला असताना, २०१९ मध्ये खचलेल्या व नव्याने बांधलेल्या रस्त्याला मोठ्या भेगा पडल्याने पन्हाळावासीयांवरचे संकट गडद झाले आहे.

२०१९ मध्ये अतिवृष्टीने पन्हाळा-बुधवारपेठ हा ९०० मीटर रस्ता खचला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याचे काम सुमारे नऊ महिने चालू होते. तोपर्यंत पन्हाळा आणि येथील पर्यटन बंद राहिले होते. आतापण या रस्त्याचा पुढील भाग अतिवृष्टी आणि भूस्खलनाने खचल्याने पन्हाळ्यातील सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत .

दरम्यान, जुन्या नाक्याजवळ खचलेल्या रस्त्याकडेने जा-ये करण्यासाठी लोकांना परवानगी दिली होती; पण त्यापुढील रस्त्याला आता भेगा पडू लागल्याने हा रस्ता चालत जाण्यासाठीदेखील बंद करण्यात आला आहे. यामुळे पन्हाळा गडावरील नागरिक भयभीत झाले आहेत. त्यातच पावसाचेही प्रमाण वाढले आहे. पाण्याचे लोट त्या रस्त्यावरुन वाहत आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता अमोल कोळी यांना विचारले असता, त्यांनी डांबरी रस्त्याचे खालील भागातील मातीचा भराव खाली दबल्याने डांबरी रस्त्याला तडे जाऊ शकतात, असे सांगितले.

३० पन्हाळा रस्ता

फोटो : २०१९ मध्ये नव्याने केलेल्या रस्त्याला तडे गेले आहेत.

Web Title: Further to the paved road of Panhala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.