कसबा सांगाव परिसरात संचारबंदीचा पहिल्याच दिवशी फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:24 AM2021-04-16T04:24:16+5:302021-04-16T04:24:16+5:30
कसबा सांगाव येथे पाच लोक पाॅझिटिव्ह आले आहेत. मात्र येथील ग्रामस्थ बिनधास्त असल्याचे चित्र या ठिकाणी आहे. सुरु असणारी ...
कसबा सांगाव येथे पाच लोक पाॅझिटिव्ह आले आहेत. मात्र येथील ग्रामस्थ बिनधास्त असल्याचे चित्र या ठिकाणी आहे. सुरु असणारी पंचतारांकित औद्योगिक वसाहत,दुकाने,हाॅटेल्स यामुळे या लाॅकडाऊनचा फज्जा उडाला तर आहेच. मात्र संचारबंदी आणि लागू असणारे १४४ कलम म्हणजे नेमके काय याची माहिती अनेकजणांना नसल्याचे चित्र होते.
-
चौकट : मागील लाॅकडाऊनमध्ये काम करणाऱ्या ग्रामसमित्या यावेळी कोठे आहेत असा सवाल संवेदनशील ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येत आहे. यावेळी लसीकरणामुळे सर्वात मोठा भार आरोग्य विभागावर आला आहे. तर पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कागल पोलीस स्टेशनला अपुरी असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या ड्युटी लावताना पोलीस प्रशासनाची दमछाक होत आहे.
---
फोटो कॅप्शन : कसबा सांगाव (ता. कागल) येथे गुरूवारी संचारबंदी असताना ही रस्त्यावर असणारे नागरिक व खासगी वाहने.