'रवळनाथ' संस्थासमूहाचा भविष्यकाळ उज्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:31 AM2021-07-07T04:31:08+5:302021-07-07T04:31:08+5:30

गडहिंग्लज : शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, विधि व सहकार, आदी क्षेत्रांतील मान्यवर व राजकारणविरहित तळमळीच्या माणसांनी एकत्र येऊन उभारलेल्या 'रवळनाथ' ...

The future of 'Ravalnath' is bright | 'रवळनाथ' संस्थासमूहाचा भविष्यकाळ उज्वल

'रवळनाथ' संस्थासमूहाचा भविष्यकाळ उज्वल

googlenewsNext

गडहिंग्लज : शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, विधि व सहकार, आदी क्षेत्रांतील मान्यवर व राजकारणविरहित तळमळीच्या माणसांनी एकत्र येऊन उभारलेल्या 'रवळनाथ' संस्थासमूहाचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, असे गौरवोद्गार यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, कोल्हापूर विभागाचे माजी संचालक प्रा. डॉ. एस. एस. चौगुले यांनी काढले.

श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटी, झेप अकॅडमी व ंइंटेन्ट करिअर अकॅडमी यांच्यातर्फे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले होते.

डॉ. चौगुले म्हणाले, यूपीएससी व एमपीएससीच्या माध्यमातून उत्तम करिअर घडविता येते; परंतु, त्यातच करिअर आहे असे नाही. क्रीडासह अन्य क्षेत्रांतही करिअरच्या अनेक संधी आहेत. त्याचा विद्यार्थ्यांनी शोध घ्यावा. विविध वृत्तपत्रांसह संदर्भग्रंथ व पुस्तकांच्या वाचनातून आपले ज्ञानभांडार अधिक समृद्ध करावे. केवळ ज्ञानाच्या आधारेच उत्तम करिअर व यशस्वी जीवन जगता येईल. संस्थापक-अध्यक्ष चौगुले यांचेही भाषणे झाले.

यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी दिव्यांग गटातून निवड झालेल्या किरण पाटील (गडहिंग्लज) या 'झेप'च्या प्रशिक्षणार्थीचा चौगुले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला.

यावेळी प्रा. दत्ता पाटील, प्राचार्य आर. एस. निळपणकर, महेश मजती, विजय आरबोळे, नंदकुमार शेळके, बी. बी. आरबोळे, सीईओ डी. के. मायदेव, व्यवस्थापक शिवानंद घुगरे, प्रशासन अधिकारी सागर माने, बाबासाहेब मार्तंड, आदी उपस्थित होते.

प्राचार्या मीना रिंगणे यांनी स्वागत केले. गौरी बेळगुद्री यांनी सूत्रसंचलन केले. रेखा पोतदार यांनी आभार मानले.

--------------------------

फोटो ओळी : गडहिंग्लज येथे किरण पाटील यांचा डॉ. एस. एस. चौगुले यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी एम. एल. चौगुले, आर. एस. निळपणकर, महेश मजती, दत्ता पाटील, मीना रिंगणे, रेखा पोतदार, आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०६०७२०२१-गड-०२

Web Title: The future of 'Ravalnath' is bright

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.