रवळनाथ संस्था समूहाचा भविष्यकाळ उज्वल : एस. एस. चौगुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 02:50 PM2021-07-07T14:50:44+5:302021-07-07T14:52:35+5:30
Education Sector Kolhapur : शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकिय, विधी व सहकार आदी क्षेत्रातील मान्यवर व राजकारणविरहीत तळमळीच्या माणसांनी एकत्र येवून उभारलेल्या रवळनाथ संस्था समूहाचा भविष्यकाळ उज्वल आहे, असे गौरवोद्गार यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोल्हापूर विभागाचे माजी संचालक प्रा. डॉ. एस. एस. चौगुले यांनी काढले.
गडहिंग्लज :शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकिय, विधी व सहकार आदी क्षेत्रातील मान्यवर व राजकारणविरहीत तळमळीच्या माणसांनी एकत्र येवून उभारलेल्या रवळनाथ संस्था समूहाचा भविष्यकाळ उज्वल आहे, असे गौरवोद्गार यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोल्हापूर विभागाचे माजी संचालक प्रा. डॉ. एस. एस. चौगुले यांनी काढले.
श्री. रवळनाथ को-आॅप हौसिंग फायनान्स सोसायटी, झेप अॅकॅडमी व ंइंटेन्ट करिअर अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले होते.
डॉ. चौगुले म्हणाले, युपीएससी व एमपीएससीच्या माध्यमातून उत्तम करिअर घडविता येते. परंतु, त्यातच करिअर आहे असे नाही. क्रीडासह अन्य क्षेत्रातही करिअरच्या अनेक संधी आहेत. त्याचा विद्यार्थ्यांनी शोध घ्यावा. विविध वृत्तपत्रांसह संदर्भगं्रथ व पुस्तकांच्या वाचनातून आपले ज्ञानभांडार अधिक समृद्ध करावे. केवळ ज्ञानाच्या आधारेच उत्तम करिअर व यशस्वी जीवन जगता येईल. संस्थापक अध्यक्ष चौगुले यांचेही भाषणे झाले.
यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी दिव्यांग गटातून निवड झालेल्या किरण पाटील (गडहिंग्लज) या ह्यझेपह्णच्या प्रशिक्षणार्थीचा चौगुले यांच्याहस्ते शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार झाला.
यावेळी प्रा. दत्ता पाटील, प्राचार्य आर. एस. निळपणकर, महेश मजती, विजय आरबोळे, नंदकुमार शेळके, बी. बी. आरबोळे, सीईओ डी. के. मायदेव, व्यवस्थापक शिवानंद घुगरे, प्रशासन अधिकारी सागर माने, बाबासाहेब मार्तंड आदी उपस्थित होते. प्राचार्या मीना रिंगणे यांनी स्वागत केले. गौरी बेळगुद्री यांनी सूत्रसंचलन केले. रेखा पोतदार यांनी आभार मानले.