जी. डी. पाटील ‘आयएसटीई’वर
By Admin | Published: November 21, 2014 09:27 PM2014-11-21T21:27:48+5:302014-11-22T00:17:16+5:30
सलग चौथ्यांदा विजय : कोरे अभियांत्रिकीच्यावतीने सत्कार
वारणानगर : येथील वारणा विभाग शिक्षण मंडळाचे सचिव जी. डी. पाटील यांची इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, (आय.एस. टी.ई.) नवी दिल्ली या देशपातळीवरील शिखर संस्थेवर निवड झाली. त्यांनी एक्झिक्युटिव्ह कौन्सिल मेंबर म्हणून सलग चौथ्यांदा विजय मिळवून बाजी मारली. आय.एस.टी.ई. नवी दिल्ली ही मानव संसद मंत्रालय यांच्याशी संलग्न शिखर संस्था आहे. या शिखर संस्थेची तीन वर्षांसाठीची निवडणूक होते.पाटील यांचा कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर यांनी सत्कार केला. उपप्राचार्य डॉ. एस. एस. जोशी, प्रा. टी. एस. जंगम, प्रा. बी. व्ही. बिराजदार, रजिस्ट्रार डी. एस. ठोंबरे, पी. एस. पाटील, जालंदर जाधव, के. बी. पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)
वारणा शिक्षण मंडळाचे सचिव जी. डी. पाटील यांची आय.एस.टी.ई. नवी दिल्ली या शिखर संस्थेवर एक्झिक्युटिव्ह कौन्सिल मेंबर म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करताना प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर.