ग्रा. पं. निवडणुकीत विरोधकांना ताकद दाखवा-- प्रकाश आवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 12:19 AM2017-09-08T00:19:03+5:302017-09-08T00:21:35+5:30

हुपरी : काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांना बाजूला ठेवून कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीची ध्येयधोरणे मान्य असणाºया इतर कोणत्याही समविचारी पक्षाशी व गटांशी स्थानिक पातळीवर युती

 G Pt Opposition's strengths in the elections - Prakash Awade | ग्रा. पं. निवडणुकीत विरोधकांना ताकद दाखवा-- प्रकाश आवाडे

ग्रा. पं. निवडणुकीत विरोधकांना ताकद दाखवा-- प्रकाश आवाडे

googlenewsNext
ठळक मुद्दे रेंदाळ, यळगूड, पट्टणकोडोलीतील कार्यकर्त्यांशी चर्चागेल्या सहा महिन्यांपासून काँग्रेस पक्षाचे काम थांबविले आहे.काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकाºयांकडून केवळ व्यक्तिद्वेषातून पदोपदी सापत्नभावाची वागणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
हुपरी : काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांना बाजूला ठेवून कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीची ध्येयधोरणे मान्य असणाºया इतर कोणत्याही समविचारी पक्षाशी व गटांशी स्थानिक पातळीवर युती करून हातकणंगले व शिरोळ तालुक्यांतील सर्वच ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढवून विरोधकांना आपली राजकीय ताकद दाखवून द्या, असे आवाहन जवाहर साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी गुरुवारी केले.

ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २२ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर जवाहर कारखाना परिसरातील रेंदाळ, यळगूड, तळंदगे, पट्टणकोडोली, इंगळी, रांगोळी आदी गावांतील आवाडे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी माजी मंत्री प्रकाश आवाडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विलासराव गाताडे यांची भेट घेऊन स्थानिक पातळीवरती करावयाच्या आघाड्या व युतीबाबत यावेळी सविस्तर चर्चा केली.

माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी गेल्या ४० वर्षांपासून काँग्रेस पक्षात कार्यरत राहून गावोगावी पक्ष वाढविण्यासाठी परिश्रम घेतले. राजकीय, सहकार, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत राहून अनेक संस्था उभारून त्या यशस्वीपणे चालवून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरती नावलौकिक प्राप्त केला आहे. आवाडे म्हटले की काँग्रेस असे जणू समीकरणच जिल्ह्याच्या पूर्व भागात गेली अनेक वर्षे निर्माण झाले होते. इतका नावलौकिक प्राप्त केलेल्या आवाडे पिता-पुत्रांना काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकाºयांकडून केवळ व्यक्तिद्वेषातून पदोपदी सापत्नभावाची वागणूक देण्यात येत आहे. त्यामुळे माजी मंत्री आवाडे यांनी गेल्या सहा महिन्यांपासून काँग्रेस पक्षाचे काम थांबविले आहे.

जिल्हा ताराराणी विकास आघाडीची स्थापना करा
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपल्या आघाडीच्या माध्यमांतून सवतासुभा मांडून काँग्रेस पक्षाबरोबरच विरोधकांनाही आपल्या राजकीय शक्तीची जाणीव करून दिली आहे. यापुढेही अशाच पद्धतीने नव्या उमेदीने कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे व गावोगावच्या ग्रामपंचायतींवर आपल्या कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीची सत्ता स्थापन करावी, असे आवाहन यावेळी माजी मंत्री आवाडे यांनी केले.

Web Title:  G Pt Opposition's strengths in the elections - Prakash Awade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.