गडहिंग्लज विभागात राष्ट्रवादीचाच वरचष्मा !

By admin | Published: September 18, 2015 09:26 PM2015-09-18T21:26:34+5:302015-09-18T23:12:26+5:30

प्रमुख सत्ताकें द्रे काबीज : गडहिंग्लज बाजार समिती, आजरा साखर कारखाना, आजरा संघावर झेंडा

Gadchalz section, NCP is the only VARCHMA! | गडहिंग्लज विभागात राष्ट्रवादीचाच वरचष्मा !

गडहिंग्लज विभागात राष्ट्रवादीचाच वरचष्मा !

Next

राम मगदूम -गडहिंग्लज--गडहिंग्लज बाजार समिती, आजरा साखर कारखाना, आजरा व गडहिंग्लज तालुका संघासह ९२ पैकी ४७ ग्रामपंचायतींची सत्ता मिळून गडहिंग्लज उपविभागात आपला वरचष्मा ठेवण्यात ‘राष्ट्रवादी’ला यश आले आहे. किंबहुना, गडहिंग्लज विभागातील प्रमुख सत्ताकेंद्रे
काबीज करून आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात बाजी मारली आहे.
स्व. बाबासाहेब कुपेकरांनी गडहिंग्लज बाजार समितीची गेल्यावेळची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मोलाची भूमिका बजावली होती. मात्र, निवडणुकीनंतर पदाधिकारी निवडीत विरोधकांनी त्यांना बाजूला सारले होते. यावेळच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वाटणीच्या चार जागा पुन्हा मिळविण्याबरोबरच आपले समर्थक जयवंतराव शिंपींना पहिल्याचवर्षी सभापतिपदी बसविण्यात संध्यादेवींनी यश मिळविले.गेल्या पाच वर्षांपासून आजरा साखर कारखाना राष्ट्रवादीच्याच ताब्यात आहे. मात्र, पदाधिकारी बदलातून ‘वेळोवेळी’ निर्माण झालेली नाराजी आणि केडीसीसीच्या निवडणुकीत अशोक चराटींना उमेदवारी नाकारल्यामुळे आजऱ्याच्या राजकारणातील समीकरणे बदलली आहेत.या पार्श्वभूमीवर आजरा कारखान्यावरील सत्ता अबाधित ठेवण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर होते. मात्र, विरोधकांची सत्तांतराची व्यूहरचना भेदून आपले ज्येष्ठ कार्यकर्ते अल्बर्ट डिसोझा यांना कारखान्याच्या अध्यक्षपदी बसविण्यात संध्यादेवींनी यश मिळविले. आजरा तालुका खरेदी-विक्री संघदेखील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीच्याच ताब्यात आहे. संघाची सत्ता हिसकावून घेण्यासाठी सर्वपक्षीय आघाडीने जंग-जंग पछाडले. मात्र, संघ आपल्याच ताब्यात ठेवण्यात राष्ट्रवादीने यश मिळविले. त्याचप्रमाणे निवडणूक बिनविरोध झालेल्या गडहिंग्लज तालुका संघाच्या सत्तेतील भागीदारी कायम ठेवण्यातही संध्यादेवींनी यश मिळविले. गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतील निवडणूक झालेल्या ९२ ग्रामपंचायतींपैकी ४७ ग्रामपंचायतींवर त्यांनी निर्विवादपणे राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला. उर्वरित बहुतेक गावात स्थानिक आघाडीत सहभागी होऊन सत्तेत सहभाग मिळविला. ‘बेरजेचे राजकारण’ हेच स्व. कुपेकरांच्या ‘राजनिती’चे वैशिष्ट्य होते. त्याच ‘राजनिती’ने संध्यादेवींनीही गडहिंग्लज विभागातील राजकारणात आपला वरचष्मा राखला आहे.

या संस्थांची मिळविली सत्ता --गडहिंग्लज बाजार समितीच्या सभापतिपदी आपले समर्थक जयवंतराव शिंपींना बसविले.
आजरा साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कार्यकर्ते अल्बर्ट डिसोझा यांना बसविले.

Web Title: Gadchalz section, NCP is the only VARCHMA!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.