बुद्धांच्या विचारांचा वारसा गाडगेबाबांनी जोपासला :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:22 AM2020-12-23T04:22:09+5:302020-12-23T04:22:09+5:30

मुरगूडमध्ये मान्यवरांचा सत्कार मुरगूड : समता प्रस्थापित करणारा बुद्धांचा धम्म हाच खरा मूळ भारतीय धर्म होय. बुद्धांच्या आचारधम्माचा वारसा ...

Gadge Baba inherited the Buddha's thoughts: | बुद्धांच्या विचारांचा वारसा गाडगेबाबांनी जोपासला :

बुद्धांच्या विचारांचा वारसा गाडगेबाबांनी जोपासला :

Next

मुरगूडमध्ये मान्यवरांचा सत्कार

मुरगूड : समता प्रस्थापित करणारा बुद्धांचा धम्म हाच खरा मूळ भारतीय धर्म होय. बुद्धांच्या आचारधम्माचा वारसा गाडगेबाबांनी आपल्या कृतिशील कार्यातून जोपासला, असे प्रतिपादन सत्यशोधक प्रबोधन महासभा महाराष्ट्रचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांनी केले.

मुरगूड येथे वनश्री मोफत रोपवाटिकेच्या वतीने आयोजित गाडगेबाबा पुण्यतिथी कार्यक्रमप्रसंगी ‘संत गाडगेबाबा आणि भारतीय धर्म’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष राजेखान जमादार, तर प्रमुख पाहुणे म्हणून शाश्वत विकास चळवळीचे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे हे होते. वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी यांचा हा उपक्रम गेली १७ वर्षे सुरू आहे.

याप्रसंगी बाजीराव नलगे, मंगल गोंधळी, पद्मावती शिंदे, महादेव मडिलगेकर, रासू डोंबारी, शंकर कांबळे, नारायण ढेरे या कष्टकरी ज्येष्ठांचा सत्कार तसेच डॉ. तानाजी कुंभार, विजय परीट, अमोल चौगले, अजित पाटील, रणजित मोरबाळे, कविता पाटील या कोराेना योद्ध्यांचा सत्कार, तसेच मुरगूडच्या उपनगराध्यक्षा हेमलता लोकरे, निढोरीचे सरपंच अमित पाटील, प्राचार्य बी. आर. बुगडे, मुरगूड शहर व ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल पाटील यांचा नूतन निवडीबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.

Web Title: Gadge Baba inherited the Buddha's thoughts:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.