दाजीपूर, राधानगरी अभयारण्यात गिधाडे दुर्मीळ

By Admin | Published: May 16, 2017 01:22 AM2017-05-16T01:22:59+5:302017-05-16T01:23:25+5:30

उन्हाळी प्राणी व पक्षी गणना : सर्वेक्षणात लाईन ट्रॅन्झिट व कॅमेरा टॅपिंग या दोन पद्धतीचा अवलंब

Gadhade is rare in Dazipur, Radhanagari Wildlife Sanctuary | दाजीपूर, राधानगरी अभयारण्यात गिधाडे दुर्मीळ

दाजीपूर, राधानगरी अभयारण्यात गिधाडे दुर्मीळ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : दाजीपूर व राधानगरी अभयारण्यातील वन्यजीव क्षेत्रात केलेल्या उन्हाळी पक्षी व प्राणी गणनेत ‘गिधाडे’दुर्मीळ झाल्याची बाब समोर आली; तर दिवसा न दिसणारे लेपर्ड कॅट (वाघाटी), गेळा, खवले मांजर, उदमांजर (ब्राऊन सिवेट) ह्या दुर्मीळ जातींच्या प्राण्यांचे अस्तित्व दिसून आले.
चार ते अकरा मे दरम्यान राधानगरी व दाजीपूर या अभयारण्यांच्या ३५ हजार १०० हेक्टर (३५१ स्क्वेअर किलो मीटर) क्षेत्रात करण्यात आलेल्या या गणनेत गवे, सांबर, भेकर, रानडुक्कर, अस्वल, ससे, वानर, शेकरू हे प्राणी प्रत्यक्ष दिसले आहेत. तर ज्या ठिकाणी मानवी अस्तिव राहू शकत नाही, अशा ठिकाणी बसविण्यात आलेल्या कॅ मेऱ्याद्वारेही गणना करण्यात आली. यात बिबट्या, रानकुत्रे, गवे, अस्वले, सांबर, भेकर, चौशिंग, तर लेपर्ड कॅट, गेळा, खवले मांजर, ब्राऊन सिवेट (उदमांजर) यांचे अस्तित्व दिसून आले.
या गणनेत दोन्ही वनक्षेत्रांत प्रत्यक्ष दिसलेले प्राणी, पाऊलखुणा, विष्टा, झाडांवरील ओरखडे यांचा अहवाल राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडे पाठविण्याचे काम वन्यजीव विभागाने सुरू केले आहे.
लाईन ट्रॅन्झिट व कॅमेरा टॅपिंग या दोन आधुनिक पद्धतीचा अवलंब या गणनेत केला. यात दोन्ही अभयरण्यांत वन्यजीव विभागाचे ६५ कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांनी ही गणना केली. या सर्व क्षेत्रांत २४ मंच उभे करण्यात आले होते. यात रात्रंदिवस ही गणना करण्यात आली. घनदाट जंगलात बिबटे, अस्वल, गव्यांचे कळप, रानकुत्रे दिसले. पक्षी गणनेत मोर, धनेश, स्वर्गीय नर्तक, हार्नबेल, पानकोंबडे, सुतार पक्षी, बगळे, अशा नियमित पक्षांचे अधिवास दिसून आला. ही गणना मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


प्राणी व पक्षी गणनेत दाजीपूर व राधानगरी या दोन अभयारण्यांतून गिधाडे दुर्मीळ झाली आहेत. यासह नैसर्गिक चक्राप्रमाणे मांसभक्षक प्राणी वाढले की, शाकाहारी प्राण्यांचे प्रमाण कमी होते. त्यानुसार यंदा रानगव्यांचे प्रमाण वाढले आहे. गणनेसाठी ६५ कर्मचाऱ्यांसह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
- सीताराम झुरे,
विभागीय वन अधिकारी (वन्यजीव)

Web Title: Gadhade is rare in Dazipur, Radhanagari Wildlife Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.