गडहिंग्लज संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:26 AM2020-12-06T04:26:13+5:302020-12-06T04:26:13+5:30
गडहिंग्लज आगाराकडून ८४ मार्गांवर बसफेऱ्या सुरू गडहिंग्लज : कोरोना महामारीच्या काळात गडहिंग्लज आगाराच्या १२४ मार्गांवरील बसफेऱ्या बंद झाल्या होत्या. ...
गडहिंग्लज आगाराकडून ८४ मार्गांवर बसफेऱ्या सुरू
गडहिंग्लज : कोरोना महामारीच्या काळात गडहिंग्लज आगाराच्या १२४ मार्गांवरील बसफेऱ्या बंद झाल्या होत्या. त्यांपैकी ८४ मार्गांवर बसफेऱ्या पूर्ववत सुरू झाल्या आहेत, अशी माहिती आगार व्यवस्थापक एस. बी. चव्हाण यांनी दिली.
......................
बातमी -२
माउली दूध संस्थेच्या अध्यक्षपदी मारुती सावंत
महागाव : शिरसंगी (ता. आजरा) येथील माउली दूध संस्थेच्या अध्यक्षपदी मारुती सावंत यांची, तर उपाध्यक्षपदी पांडुरंग गुरव यांची निवड झाली. माजी अध्यक्ष दत्तात्रय मातवणकर यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला.
यावेळी आनंदा गुरव, श्रावण देसाई, मारुती बुडके, गणपतराव बुडके, शिवाजी सावंत, संतोष पताडे, प्रभाकर देसाई, रामचंद्र सावंत, गणेश मातवणकर, रामचंद्र देसाई, तानाजी देसाई उपस्थित होते. सचिव अनिल मुळीक यांनी आभार मानले.
............................
बातमी -३
मधमाश्यांच्या हल्ल्यात निट्टूरमध्ये सहा जखमी
कोवाड : निट्टूर (चंदगड) येथे मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच महिला व एक पुरुष मिळून सहाजण जखमी झाले. हे सर्वजण मळणीसाठी शेतात गेले होते. तिथे मधाचे पोळे असणाऱ्या झाडावर माकडांनी धुमाकूळ घातल्याने मधमाश्यांनी या सहाजणांवर हल्ला केला. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
-----