गडहिंग्लज संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:21 AM2021-03-24T04:21:47+5:302021-03-24T04:21:47+5:30

गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात सूक्ष्म जीवशास्त्र विभागातर्फे ‘सूक्ष्म जीवशास्त्रातील नवे बदल’ याविषयावर डॉ. ए. आर. जाधव यांचे ...

Gadhinglaj Brief News | गडहिंग्लज संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज संक्षिप्त बातम्या

Next

गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात सूक्ष्म जीवशास्त्र विभागातर्फे ‘सूक्ष्म जीवशास्त्रातील नवे बदल’ याविषयावर डॉ. ए. आर. जाधव यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य मंगलकुमार पाटील होते.जाधव म्हणाले, बदलत्या काळाला जर तारायचे असेल तर सूक्ष्म जीवशास्त्राचा अभ्यास अत्यंत गरजेचा आहे. तो जर केला तरच आपण कोरोनासारख्या महामारीतून बाहेर पडू शकतो.

यावेळी महेश कदम, शरिफा देसाई, स्नेहा पाटील, धनश्री पाटील आदींसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

-

- २) ‘शिवराज’मध्ये राज्यघटनेविषयी व्याख्यान

गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग व आय.क्यू.ए.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय राज्यघटनेचा परिचय’ याविषयावर डॉ. आण्णासाहेब हरदारे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सुजाण नागरिक घडण्यासाठी राज्यघटनेतील ‘हक्क व कर्तव्ये’ यांचे चिंतन होणे आवश्यक आहे. यावेळी प्र. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण, डॉ. अनिल पाटील, प्रा. धर्मवीर क्षीरसागर, प्रिया भोसले, अंकिता मशाळकर आदी उपस्थित होते.

--- ३) शिंदे हायस्कूलमध्ये ‘अक्षरांगण’'चे प्रकाशन

गडहिंग्लज : येथील वि. दि. शिंदे हायस्कूलची विद्यार्थिनी जान्हवी संतोष तेली हिने लिहिलेल्या ‘अक्षरांगण’ या कविता संग्रहाचे प्रकाशन बालसाहित्यिक विभुते यांच्या हस्ते झाले. यावेळी पंचायत समिती सदस्या जयश्री तेली, राजेंद्र खोराटे, मुख्याध्यापक डी. व्ही. चव्हाण, कमल माने, श्रीकांत नाईक ए. जे. हराडे, गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हलबागोळ, हसूरचंपू सरपंच प्रभावती बागी आदी उपस्थित होते.

---- ४) योगा स्पर्धेत बेळगावकर, माळगी प्रथम

गडहिंग्लज : येथील योग विद्या धामतर्फे आयोजित योगा स्पर्धेत प्रिती बेळगावकर व श्रुती माळगी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेत जयश्री चराटी, पूजा जाधव, पुष्पा बस्ताडे, मंजू दड्डी, सुलोचना मोरे यांनी यश मिळविले. अध्यक्षस्थानी सुरेखा वाली होत्या. विजेत्यांना न्यायाधीश भानुप्रिया दुर्गवडे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. यावेळी योगशिक्षिका पल्लवी माने, शारदा आजरी यांची भाषणे झाली. सविता तुरबतमठ, सविता मोहिते, महादेवी मोळदी यांनी योगाचे झालेले फायदे याविषयी मनोगत व्यक्त केले.

--- ५) हलकर्णीत मॅरेथॉन स्पर्धेला प्रतिसाद

गडहिंग्लज : हलकर्णी येथील आदित्य युथ क्लबतर्फेआदित्य शेरवी यांच्या स्मरणार्थ आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत प्रवीण गडकरी (संकेश्वर), अभिजीत पाटील (कळविकट्टे), विशाल साखरे, वैभव नांगरे (नूल) , लक्ष्मण धुमाळ (माद्याळ) यांनी यश मिळविले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवानंद मठपती, संतोष सावंत, विजय शेरवी, शेखर पाटील, प्रेम मऱ्यापगोळ आदी उपस्थित होते.

६) महागावमध्ये जागतिक वन दिन साजरा

गडहिंग्लज : महागाव येथील महात्मा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक वनदिनानिमित्त वृक्ष भेट कार्यक्रम झाला. वाढते तापमान, प्रदूषण व ऋतुचक्रामध्ये झालेले बदल यामध्ये संतुलन राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करणे काळाची गरज असल्याचे वनपाल एस. एस. पाटील यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य आय. एस. पाटील यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

-- ७) हलकर्णी आरोग्य केंद्रास सीईओंची भेट

गडहिंग्लज : हलकर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी भेट दिली. हलकर्णी केंद्रातंर्गत २१ गावांसाठी ५ हजार लसींचे डोस उपलब्ध झाले असून १०० टक्के लसीकरण पूर्ण करा, असे आवाहन केले. यावेळी बीडिओ शरद मगर, तहसीलदार दिनेश पारगे, वैद्यकिय अधिकारी निलीमा धबाले, स्नेहा दाभाडे, सरपंच योगिता संगाज, अर्चना शिंदे आदी उपस्थित होते.

------ ८) हलकर्णी उर्दू शाळेत साहित्य वाटप

गडहिंग्लज : हलकर्णी येथील उर्दू शाळेत दाई फौंडेशनतर्फे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर, स्कूल बॅग, वह्या आदी शालेय साहित्य देण्यात आले. यावेळी क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या अहद ग्रुप, लबैक संघाला रोख रक्कम व चांदीचे नाणे देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका परवीन दीडबाग, इमाम हुसेन, मोहम्मद मालदार, मेहबूब कारदरभाई अल्ताफ कडलगे, फजल मालदार, अबुबकर नगरकर आदी उपस्थित होते.

Web Title: Gadhinglaj Brief News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.