गडहिंग्लज संक्षिप्त बातम्या..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:23 AM2021-03-28T04:23:10+5:302021-03-28T04:23:10+5:30
महालक्ष्मी यात्रा रद्द गडहिंग्लज : इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील महालक्ष्मी देवीची ६ ते ८ एप्रिल अखेर होणारी पंचवार्षिक यात्रा ...
महालक्ष्मी यात्रा रद्द
गडहिंग्लज : इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील महालक्ष्मी देवीची ६ ते ८ एप्रिल अखेर होणारी पंचवार्षिक यात्रा रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती सरपंच उत्तम कांबळे यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत पदाधिकारी, मानकरी व ग्रामस्थांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यात्रा कालावधीतील धार्मिक विधी पार पाडण्यासाठी ५ जणांची समिती नेमण्यात आली आहे. त्यामध्ये सयाजीराव देसाई, आनंदराव पोवार, अमृतराव पाटील, सुरेंद्र देशपांडे, अशोक पाटील यांचा समितीमध्ये समावेश आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बाहेरच्या व्यक्तींनी गावात येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
-------
‘साधना’मध्ये यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
गडहिंग्लज : येथील साधना काॅलेज ऑफ काॅमर्स मध्ये जान्हवी पोवार, वर्षा हजाम या यशवंत विद्यार्थिनींचा सत्कार झाला.
यावेळी संस्था सचिव जे.बी.बारदेस्कर पर्यवेक्षक रफिक पटेल, मुख्याध्यापक गंगाराम शिंदे, प्राचार्या ए. आर. पोवार आदी उपस्थित होते.
बातमी -३ 'साधना काॅमर्स'मध्ये कार्यशाळा
गडहिंग्लज : येथील साधना काॅलेज ऑफ काॅमर्समध्ये ‘माईंड पाॅवर आणि शैक्षणिक जीवनातील यशाचे रहस्य’ या विषयावर कार्यशाळा झाली. यावेळी ‘लक्ष्य एज्युकेशन सर्व्हिसेस’चे विनोद कुऱ्हाडे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी संस्था सचिव जे. बी. बारदेस्कर, प्राचार्या गंगाराम शिंदे, पर्यवेक्षक रफिक पटेल आदी उपस्थित होते.
व्ही. पी. भुईंगडे यांनी प्रास्ताविक केले. व्ही. एम. भोसले यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्या ए. आर. पोवार यांनी आभार मानले.
--------
बातमी -४ ‘ओंकार’मध्ये ‘शिका व कमवा’ चे प्रशिक्षण
गडहिंग्लज : येथील ओंकार शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील गृहशास्त्र व ‘रासेयो’ विभागातर्फे ‘शिका व कमवा’ अंतर्गत स्वयंरोजगार प्रशिक्षण पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ बनवून विक्री करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
याकामी डॉ. गंगासागर चोले, डॉ. काशिनाथ तनंगे यांनी परिश्रम घेतले. त्यांना प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांचे प्रोत्साहन लाभले.
------