गडहिंग्लज संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:18 AM2021-06-06T04:18:53+5:302021-06-06T04:18:53+5:30

जिल्ह्यात दुसरी गडहिंग्लज : ‘माझी वसुंधरा’ अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत गडहिंग्लज नगरपरिषदेने राज्यात ३४ वा., तर जिल्ह्यात दुसरा ...

Gadhinglaj Brief News | गडहिंग्लज संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज संक्षिप्त बातम्या

Next

जिल्ह्यात दुसरी

गडहिंग्लज : ‘माझी वसुंधरा’ अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत गडहिंग्लज नगरपरिषदेने राज्यात ३४ वा., तर जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला. राज्यातील २३५ नगरपरिषदांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. याकामी नगराध्यक्षा स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष महेश कोरी, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, पाणीपुरवठा अभियंता अनिल गंदमवाड यांच्यासह सर्व नगरसेवक, कर्मचारी व शहरातील सर्व नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले.

नांगनूर येथील मृतांच्या वारसांना मदत करा

गडहिंग्लज : नांगनूर ( गडहिंग्लज ) येथील नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेले अजित कांबळे, गिरिजा कांबळे व संगीता कांबळे यांच्या वारसांना तातडीने मदत करावी, अशी मागणी आमदार राजेश पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

मुगळी (ता. गडहिंग्लज ) येथे पावसात आसरा घेतलेल्या पोल्ट्रीची भिंत कोसळून हा अपघात घडला आहे. त्यामुळे तीनही गोरगरीब कुटंबे उघड्यावर पडली आहेत. त्यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन निधीतून मृतांच्या वारसांना मदत करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रातून केली आहे.

Web Title: Gadhinglaj Brief News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.