गडहिंग्लज संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:17 AM2021-06-22T04:17:13+5:302021-06-22T04:17:13+5:30
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयाच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी राज ठाकरे कोविड अलगीकरण केंद्रास १० हजारांची मदत केली. यावेळी प्रा. किसनराव ...
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयाच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी राज ठाकरे कोविड अलगीकरण केंद्रास १० हजारांची मदत केली. यावेळी प्रा. किसनराव कुराडे, अनिल कुराडे, प्राचार्य एस. एम. कदम, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विशाल कुराडे, दिग्विजय कुराडे, बसवराज आजरी, संतोष शहापूरकर, तानाजी चौगुले, विक्रम शिंदे, पी. डी. पाटील, नागेश चौगुले, प्रभात साबळे उपस्थित होते.
-----
२) ‘शिवराज’मध्ये नव्या अभ्यासक्रमांना मंजुरी
गडहिंग्लज : येथील शिवराज विद्या संकुलामध्ये बी.एस्सी अॅनिमेशन, बी.एस्सी फूड सायन्स, बी.कॉम इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आय.टी.) या पदवी अभ्यासक्रमांना व संख्याशास्त्र विषयाच्या तृतीय वर्ष तुकडीला शासनाची मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव प्रा. अनिल कुराडे यांनी दिली.
३) चंदगडला स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा सुरू करा
चंदगड : चंदगड येथे बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बँकेची एकच शाखा आहे. लोकसंख्येच्या मानाने व आजूबाजूच्या पन्नासपेक्षा अधिक गावांच्या लोकांना या एकाच बँकेवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे येथे नेहमीच मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यामुळे नागरिकांची गैरसोयीचे टाळण्यासाठी चंदगडला स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करावी, अशी मागणी नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांनी बँकेच्या विभागीय कार्यालयाकडे निवेदनातून केली आहे.