गडहिंग्लज संक्षिप्त बातम्या..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:28 AM2021-08-13T04:28:09+5:302021-08-13T04:28:09+5:30
ग्रंथपाल दिन गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील ...
ग्रंथपाल दिन
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील होते.
ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या प्रतिमेचे बी. बी. वाघमोडे यांच्याहस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी अनिल उंदरे, डॉ.सरला आरबोळे, सुभाष कुटकोळे, सुरेश राणे, बाबासाहेब कांबळे, राजू गवळी आदी उपस्थित होते.
गडहिंग्लज आगाराने बसफेऱ्या वाढवाव्यात
गडहिंग्लज : ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सेवेसाठी गडहिंग्लज आगाराने मुक्कामीसह सर्व बसफेऱ्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी शिवसेनेचे उपशहरप्रमुख काशीनाथ गडकरी यांनी आगारप्रमुख संजय चव्हाण यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, जिल्ह्यात सर्व व्यवसाय, बाजारपेठा सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागातून कामानिमित्त लोक शहराकडे येत आहेत. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे. परंतु, बसफेऱ्या कमी असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यासाठी बसफेर्या वाढवून मुक्कामी बसेस सुरू कराव्यात.
शिष्टमंडळात तेजस घेवडे, अनिकेत चव्हाण, महादेव नाईक यांचा समावेश होता.