गडहिंग्लज संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:45 AM2021-03-13T04:45:35+5:302021-03-13T04:45:35+5:30

गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयाच्या धनश्री भोसले हिने शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत द्वितीय तर स्नेहा रहाटवळ हिने सहावा ...

Gadhinglaj Brief News | गडहिंग्लज संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज संक्षिप्त बातम्या

Next

गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयाच्या धनश्री भोसले हिने शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत द्वितीय तर स्नेहा रहाटवळ हिने सहावा क्रमांक पटकाविला. त्यांना प्रा. डॉ. एम. डी. पुजारी, सचिन जानवेकर, महेश व्हंडकर, प्रा. एम. आय. मुजावर, प्रमोद पुजारी यांचे मार्गदर्शन लाभले.

- २) रस्ता दुरूस्तीची मागणी

गडहिंग्लज : शहरातील उपराटे गल्ली व नदीवेस परिसरात पाईपलाईन कामासाठी खुदाई करण्यात आलेल्या रस्त्याची त्वरित दुरूस्ती करावी व खुदाईवेळी काढण्यात आलेली माती व दगडांचा ढीग हटवावा, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख अशोक शिंदे यांनी मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्याकडे निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात उपशहरप्रमुख राहुल खोत, गटप्रमुख मंथन भडगावकर, सचिन प्रसादे, मनिष हावळ, देवदत्त जोशी आदींचा समावेश होता.

- ३) अत्याळ-करंबळीमध्ये विकासकामांना प्रारंभ

गडहिंग्लज : तालुक्यातील अत्याळ व करंबळी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ३ कोटी १३ लाख रुपये खर्चाच्या रस्ता कामांचा प्रारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्याहस्ते झाले. जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सरपंच प्रवीण माळी, किसन माळी, दादा मोहिते, अनुप पाटील, एस. आर. पाटील, विजय मोहिते, जयसिंग पाटील, विजय पाटील, पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते.

-

- ४) हरळीमध्ये पदाधिकाऱ्यांचा सत्कार

गडहिंग्लज : हरळी बुद्रुक येथील सिम्बायोसीस स्कूलमध्ये महिला दिन व ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला.

यावेळी सरपंच नीलम कांबळे, उपसरपंच बाजीराव गोरूले, शिरीष हरळीकर, बळवंत गुरव, मेघा पाटील, नीलिमा डवरी, छाया खवरे, अंजन साटपे, वहिदा मुल्ला, कविता कागिणकर, अनुपमा देसाई, अंकिता होडगे यांच्यासह रावसाहेब मुरगी दिगंबर पाटील, यांचा डॉ. सतीश घाळी यांच्याहस्ते सत्कार झाला.

- ५) 'शिवराज'मध्ये यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

गडहिंग्लज : शहरातील शिवराज महाविद्यालयात महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. संस्थाध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्याहस्ते प्रतिमापूजन झाले. डॉ. जी. जी. गायकवाड, डॉ. एन. आर. कोल्हापुरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्था सचिव प्रा.अनिल कुराडे, प्राचार्य एस. एम. कदम, तानाजी चौगुले, वृषाली हेरेकर, सुधीर मुंज, बी. एम. जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: Gadhinglaj Brief News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.